बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर जाण्याची परवानगी

पुणे | राज्य सरकारने नुकतंच लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली आहे. त्यानंतर आता पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे शहरासाठी लॉकडाऊन 4 ची नियमावली जाहीर केली आहे.

पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी घरकाम करणाऱ्या महिलांना काम करण्यात परवानगी देण्यात आली आहे. मात्र सोसायटी धारकांनी योग्य ती खबरदारी घेऊन घरकाम करणाऱ्या महिलांना काम करण्याची परवानगी द्यावी, असं यात नमूद करण्यात आलं आहे.

पुण्याच्या मध्यवर्ती भागातील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता या ठिकाणची दुकाने उघडण्यासही परवानगी दिली आहे.

पुण्यातील छत्री, रेनकोट, घड्याळे, मौल्यवान धातू, बांधकाम क्षेत्राला साहित्य पुरवणारी दुकाने, शेती संबंधित दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शहरातील काही भागात पीएमपीएलच्या वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत 1972 नागरिक; मुख्यमंत्र्यांची माहिती

कोरोनासोबत जगायला शिका, यावर सध्या काहीही औषध नाही- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

ग्रामीण भागात मजुरांना काम द्या, अन्यथा काय करायचे ते सांगतो – प्रकाश आंबेडकर

…म्हणून मी नरेंद्र मोदी यांना राम मानते; रामायणातील सीतेचा खुलासा

विश्वासघाताने बनलेल्या सरकारबाबत जनतेत विश्वास तरी कसा निर्माण व्हावा? भाजपची टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More