पुण्याची मुंबईवर मात, आयपीएलच्या फायनलमध्ये धडक

मुंबई | आयपीएलच्या प्ले ऑफमधील पहिल्या सामन्यात पुण्याने मुंबईवर मात केली. या विजयासह पुण्याने थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. पुण्याने हा सामना २० धावांनी जिंकला.

सर्वप्रथम फलंदाजी करताना पुण्याने ४ बाद १६२ धावा केल्या होत्या, मात्र मुंबईला हे आव्हान पेलवलं नाही. ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने त्यांना २० षटकात ९बाद १४२ धावाच करता आल्या. दरम्यान, पुण्याकडून अजिंक्य रहाणेने ४३ चेंडू ५६ धावा, मनोज तिवारीने ४८ चेंडूत ५८ धावा आणि महेंद्रसिंग धोनीने २६ चेंडूत ४० धावा केल्या.