बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे कोरोनामुक्त होतंय! आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

पुणे | गेले काही महिने कोरोना महामारीने पुणेकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, अलिकडे पुण्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.

पुण्यात आज दिवसभरात 256 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 333 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 12 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

पुण्यात सध्या 221 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्याची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,87,421 एवढी आहे. तर पुण्यात सध्या 2412 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत पुण्यात एकूण 8774 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 4,76,235 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. प्रशासनाच्या कठोर पावलांमुळेच पुण्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! रिक्त पदे भरण्याचा शासननिर्णय जारी

“भारतमातेचं नाव घेऊन सत्ता मिळवणारेच भारतमातेला विकायला निघालेत”

यंदा गणेशोत्सव साजरा होणार; लालबागच्या भक्तांसाठी ‘ही’ आनंदाची बातमी

सर्वसामान्यांना मोठा धक्का! LPG सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या; पाहा नवे दर

वाह! तोंडावर सात टाके, तरी देखील भारतीय बॉक्सर लढला; झुंजारपणाचं सर्वत्र कौतुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More