बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे हादरलं! फुरसुंगीत कॅनॉलमध्ये एकामागोमाग एक मृतदेह आले वाहत

पुणे | देशात अनेक घटना घडत असतात. यामध्ये आजकाल कधी हाणामारीच्या, तर कधी हत्या केल्याच्या घटना घडल्याची माहिती वारंवार समोर येत असते. अशातच पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

फुरसुंगी गावातील कॅनॉलमध्ये मंगळवारी सकाळच्या सुमारास दोन मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील फुरसुंगी गावातील कॅनॉलमध्ये एका पुरूषाचा मृतदेह वाहून आला असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी  अग्निशामक दलाला दिली. माहिती मिळताच तातडीने अग्निशामक दलाच्या जवानांनी घटना स्थळी धाव घेतली. 

त्या ठिकाणी पोहचल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी त्या पुरूषाचा मृतदेह बाहेर काढला. पुरूषाचा मृतदेह बाहेर काढताच त्या पाण्यातून आणखीण एक मृतदेह वाहत येत असल्याचं त्यांना दिसलं. तो मृतदेह जवळ आल्यानंतर तो एका महिलेचा मृतदेह असल्याचं समजलं. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी ते दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी ते मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधील पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं समजतं आहेत. तसेच ते दोन्ही मृतदेह कोणाचे आहेत, त्या दोघांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? त्याचप्रमाणे ही आत्महत्या आहे की घातपात आहे हेदेखील स्पष्ट झालेलं नाही.

थोडक्यात बातम्या-

हर एक फ्रेंन्ड कमीना होता है! लग्नात मित्रांनी असं गिफ्ट दिलं की; ते पाहून तुम्हीही व्हाल चकीत, पाहा व्हिडीओ

लग्नाचा पहिला वाढदिवस, पत्नीने सांगितलं पार्लरला जायचं अन् त्यानंतर घडला ‘हा’ प्रकार

‘देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली पण…’ निलेश राणे यांच्या आरोपावर उदय सामंतांचं स्पष्टीकरण

चिमुकल्याचे प्राण वाचवणं होतं अशक्य; 16 कोटीच्या इंजेक्शनसाठी विरूष्कासह इतर कलाकारांनीही घेतला पुढाकार

“महागाईचं भांडवल करून सत्तेत आलेल्यांना सामान्य जनतेचा कळवळा उरला नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More