Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यात नवरा-नवरीसह ३५ वऱ्हाड्यांना कोरोना; ‘या’ भागातील सात गावं केली सील

पुणे | पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एका लग्नाने प्रशासनाची चांगलीच झोप उडवली आहे. नवरा-नवरीसह ३५ वऱ्हाडी मंडळींना कोरोना झाल्याचं निष्पन्न झाल्याने एकच हाहाकार उडाला असून जुन्नरमधील ७ गावं सील करण्यात आली आहेत.

काही दिवसांपूर्वी हा विवाहसोहळा पार पडला आहे. ५० पेक्षा जास्त नातेवाईकांना परवानगी नसताना हा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. धक्कादायक प्रकार म्हणजे डीजेच्या तालावर वरात देखील पार पडली. या वरातीला अनेकांनी हजेरी लावली होती.

नवरा-नवरीसह ३५ जणांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं असून अद्याप काही जणांनी कोरोना चाचणी बाकी आहे. ही मंडळी आसपासच्या गावातील असल्यानं ही सात गावं सील करण्यात आली आहेत.

सात गावांमधील हजारो नागरिकांना सध्या कॉरंटाईन करण्यात आलं असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काम सुरु आहे. तर दुसरीकडे डीजे चालकावर ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांनी एनडीएमध्ये येऊन नरेंद्र मोदींसोबत काम करावं, केंद्रीय मंत्र्याचं निमंत्रण

संजय राऊतांचं भाजपला ओपन चॅलेंज; “हिंमत असेल तर महाराष्ट्रात ‘हे’ करुन दाखवा!”

‘तुला मनसे सांगणं आहे…’, रूपाली पाटील यांनी केतकी चितळेला सुनावले खडे बोल

कार्यकारी अध्यक्ष होताच हार्दिक पटेलांनी केलं चुकीचं ट्विट, ट्रोल झाल्यावर केलं डिलीट

दया नायकांनी पकडलेल्या विकास दुबेच्या हस्तकांना एन्काऊंटरची भीती, केली ‘ही’ मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या