Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी हत्या; चेहऱ्यावर कोयत्यानं सपासप वार, हातही छाटला

पुणे | पुण्यात आज काळजाचा थरकाप उडवणारं हत्या प्रकरण घडलं आहे. गुन्हेगाराच्या घरात घुसून अज्ञातांची त्याची कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली. कोंढव्यात ही धक्कादाक घटना घडली. घनश्याम उर्फ पप्पू पडवळ असं हत्या झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आज सकाळी अज्ञात टोळक्याने पप्पू पडवळच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या चेहऱ्यावर कोयत्याच्या सहाय्याने सपासप वार करण्यात आले. तसेच त्याचा हातही छाटण्यात आला. हल्ला इतका भीषण होता की पप्पू पडवळच्या घरात रक्ताचा छडा पडला होता. पप्पू पडवळने प्राण सोडल्यानंतर गुन्हेगारांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून घटनेचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, पप्पू पडवळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. याआधीही त्याच्यावर हल्ले झाले होते. एकदा त्याच्यावर फायरिंग झाली होती. त्याचा पैसे व्याजानं देण्याचा व्यवसाय होता, त्यावरुन अनेकांसोबत त्याचे वाद देखील होते.

विकास दुबे संबंधीच्या बातम्या-

विकास दुबेच्या लव्हमॅरेजची रक्तरंजीत कहाणी; सासू-सासऱ्यांचा विरोध असा काढला मोडून

अंत्यविधीनंतर विकास दुबेची बायको भडकली, संतापाच्या भरात केलं ‘हे’ धक्कादायक विधान!

पोलिसांनी विकास दुबेचा एन्काऊंटर केला खरा, मात्र आता ‘या’ अजब गोष्टीची एकच चर्चा!

शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-

सरकारस्थापनेबाबत भाजपशी चर्चा झाली होती का?, शरद पवारांचा गौप्यस्फोट म्हणाले…

तुम्ही या सरकारचे हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल?; शरद पवारांचं आश्चर्यकारक उत्तर

तेव्हा मात्र मला मोठा धक्काच बसला अन् समजलं की…..- शरद पवार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या