काल रात्री पुण्यात घडली धक्कादायक घटना; पुणेकरांची उडाली झोप

Pune News l विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. पुण्यात काल एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात रविवारी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोयता गँगच्या गुंडांनी दहशत घातल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पुणेकरांमध्ये पसरले भीतीचे वातावरण :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील कॅम्प परिसरात 5 ऑगस्ट रोजी म्हणजेच काल रात्री कोयता गँगच्या गुंडांनी दहशत घातली आहे. यावेळी कोयता गँगच्या टोळक्याने एका वाईन शॉपीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला असून पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. कॅम्प परिसरात तोडफोड केलेल्या वाईन शॉपच नाव न्यूयॉर्क वाईन शॉप असं आहे. तसेच रात्रीच्या सुमारास झालेल्या कॅम्प परिसरातील घडलेली संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे.

Pune News l कोयता गँगच्या गुंडांचा प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा :

गेल्या अनेक दिवसांमध्ये अशा धक्कादायक घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत, तसेच याप्रकरणी पोलिस आणि प्रशासन अशा घटनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील पुण्यातील नागरिकांनी केला आहे. तसेच कॅम्प परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगच्या गुंडांचा प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी देखील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

पुण्यातील हडपसर, वाघोली व पुण्यातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर कोयता गँगची दहशत असल्याचे समोर आले आहे. यामुळे कोयता गँगमधील गुंड पुन्हा एकदा नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र दिसत आहे.

News Title : Pune Koyata Gang News

महत्त्वाच्या बातम्या-

‘मी तरुण होते आणि एकटी रहायचे…’; महेश भट्ट यांच्याबाबत अभिनेत्रीचा खुलासा

अजित पवार लाडक्या बहीण योजनेसंदर्भात लवकरच ‘हा’ मोठा निर्णय घेणार

मराठा, कुणबी दरोडेखोर आहेत का? आंबेडकरांनी ‘या’ नेत्याला दिल चोख प्रत्युत्तर

LIC ने सादर केल्या दोन भन्नाट योजना; या लोकांना मिळणार खास सुविधा

सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट