Ladke Daji Yojana l राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेला राज्यभरातून तुफान प्रतिसाद येत आहे. त्यामुळे या योजनेची राज्यभर चर्चा सुरु आहे. अशातच आता लाडक्या बहीण योजनेनंतर पुणे येथील राया बिर्याणी या हॉटेलने पुण्याचे लाडके दाजी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत लाडक्या दाजीला बिलावर दर महिन्याला तब्बल 1500/- रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
पुण्यात राबवली लाडका दाजी योजना :
या संदर्भात अधिक माहिती अशी की, राज्यसरकारच्या लाडक्या बहीण योजनेनंतर पुणे येथील राया बिर्याणी या हॉटेलने पुण्याचे लाडके दाजी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या दाजीला बिलावर दर महिन्याला तब्बल 1500/- रुपयांचे अनुदान मिळणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून लाडक्या दाजींनी लाडक्या बहिणीला शक्यतो आठवड्यातून एकदा जेवायला घेऊन जावा लागणार आहे.
मात्र लाडका दाजी योजनेचा लाभ घेण्यासाठी हॉटेल मालकाने या बाबतीत काही नियम व अटी दिल्या आहेत. या योजनेचा लाभ फक्त पुणे शहरातील सदाशिव पेठ येथील राया बिर्याणी या हॉटेलमध्येच मिळणार आहे. मजेशीर बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेनंतर राज्यात लाडकी सून योजना, लाडका जावई योजना, लाडका भाऊ योजना अशा अनेक मजेशीर योजना सुरू व्हाव्या अशा मागणी केली जात होती.
Ladke Daji Yojana l पुण्याचे लाडके दाजी योजनेच्या अटी काय?
– लाडक्या दाजींनी लाडक्या बहिणीला आठवड्यातून एकदा तरी जेवायला आणावे.
– सर्वात महत्वाचं म्हणजे लाडक्या दाजीने मैत्रिणी सोबत येऊ नये. अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही.
– तसेच दाजी बाहेर “पार्टी” करून येऊ शकतात. कारण इतर लाड आपल्याकडे नाहीत.
– युती, वंचित, मनसे, आघाडी या सर्व पक्षीय दाजींसाठी देखील ही योजना सुरु आहे.
– लाडका दाजी ही योजना फक्त पुण्यातील राया बिर्याणी, सदाशिव पेठ येथेच लागू आहे. तसेच दुसऱ्या हॉटेलात जाऊन भांडण मात्र करू नये.
News Title- Pune Ladke Daji Yojana
महत्वाच्या बातम्या-
गुजरात टायटन्सच्या हेड कोचची धुरा ‘हा’ खेळाडू सांभाळणार; जाणून घ्या त्यामागची 3 मोठी कारणे
सुप्रियाताईंना देखील लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मिळणार?
‘अशा’ व्यक्तींनी चुकूनही सफरचंद खाऊ नये; अन्यथा होतील गंभीर परिणाम
“फडणवीसांच्या घाणेरड्या राजकारणाचा अंत जवळ”; संजय राऊतांची भविष्यवाणी