चंद्रावर १ एकर जागा विकत घेतलेल्या पुण्यातील महिलेची फसवणूक

पुणे | पुण्यातील एका महिलेला टीव्हीवर जाहिरात पाहून चक्क चंद्रावर जागा विकत घेतली होती. आता या महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

राधिका दाते-वाईकर असं या महिलेचं नाव आहे. त्या कोथरुडमध्ये राहतात. आता मुलाच्या शिक्षणाला पैसे कमी पडत असल्याने आपल्याला हे पैसे मिळावेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

परदेशातील एका कंपनीची जाहिरात पाहून त्यांनी २००५ साली चंद्रावर जागा विकत घेण्यासाठी पैसे भरले होते. त्यावेळी त्यांना १ एकर जागा बुक झाल्याचं सांगण्यात आलं होतं.

काही दिवसांनंतर संबंधित कंपनीचा फोन नंबर आणि फॅक्स बंद झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. आता त्यांनी याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दिल्याचं सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून नरेंद्र मोदींना मिळाला पहिलाच फिलीप कोटलर पुरस्कार 

-श्रीदेवीच्या भूमिकेत दिसणार प्रिया प्रकाश वारियर, पाहा सिनेमाचा टीझर

-विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचं निधन

-शिवाजीराव देशमुख नेमके कोण होते?… वाचा थोडक्यात- 

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी तब्बल १ हजार झाडं कापली!