Top News पुणे महाराष्ट्र

…म्हणून पुण्यातील ‘या’ महिला डाॅक्टरच्या वडिलांना चक्क शरद पवारांचा फोन, म्हणाले…

पुणे | पुण्यातील वायसीएम रूग्णालयातील डाॅ. आरती उदगीरकर यांनी कोरोनाच्या काळात चोखपणे आपली सेवा बजावली. मात्र कोरोना रूग्णांच्या संपर्कात आल्यानं दुर्दैवानं आरती यांना कोरोनाची लागण झाली. आरती यांना कोरोना झाल्यानं संपूर्ण कुटुंबच काळजीत पडलं. मात्र या कुटूंबाला आधार देण्यासाठी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पुढाकार घेतला आहे.

पवारांनी वायसीएम रूग्णालयात चालू असलेल्या आरती यांच्या उपचाराची माहिती जाणून घेतली. रूग्णालयातील इतर रूग्णांसाठी 50 रेमडेसीवर औषधही पुरवली. आरती यांचे वडील नरसिंगराव उदगीरकर यांच्याशी बोलताना पवार म्हणाले की, डॉक्टरांशी माझं बोलणं झालं आहे. डॉ. आरती यांना विश्रांती घेण्याची गरज आहे. आरती यांना बरं होण्यासाठी अजून दोन-तीन आठवडे लागतील. काळजी घेण्याची काही कारण नाही.

तसेच धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांनीही कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून बरे झाल्यावर अवघ्या 15 दिवसांत कामालाही लागले आहेत. डॉ. आरती यांच्यासाठी उत्तम औषधं व इंजेक्शनची व्यवस्था करण्यात आली आहे. आरती यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर मला माहिती कळवत आहेत, असा दिलासाही पवारांनी यावेळेस तीच्या कुटंबीयांना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“ज्यांचं नाव वापरून सत्तेत आलात त्यांचा हाच पुतळा तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही”

बारामतीत ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी…., अजितदादांच्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना

प्रवीण दरेकर यांचा मुंबई महानगरपालिकेवर गंभीर आरोप, म्हणाले…

अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या