FACT CHECK

पुण्यात मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडले मोठे हाडांचे अवशेष

पुणे | पुण्यामध्ये सध्या मेट्रोचं काम सुरु आहे. स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रोचं खोदकाम सुरु करण्यात आलंय. या खोदकामादरम्यान एका प्राण्याचे प्रचंड मोठे असे अवशेष आढळून आलेत.

सध्या हे हाडांचे अवशेष पुरातत्वविभागाकडे सोपवण्यात आलेत. पुरातत्व विभागातील संशोधकांच्या अंदाजानुसार, हे अवशेष किमान दोन हजार वर्षांपूर्वीचे असण्याची शक्यता आहे.

मेट्रोच्या खोदकामादरम्यान मंडई परिसरात हे अज्ञात प्राण्याचे अवशेष सापडलेत. कामगारांनी खोदकाम सुरु केल्यानंतर अवघ्या दहा मीटर अंतरापासून प्राण्यांची हाडं सापडली. त्यानंतर हे अवशेष काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आलेत.

ही हाडं हत्तीची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. हाडं सापडलेल्या ठिकाणी पुरातत्व खात्यामधील जाणकार तसंच इतिहास संशोधकांनी भेट दिलीये. या हडांचा सखोल अभ्यास करूनच त्यांचं रहस्य उलगडण्यास मदत होईल.

महत्वाच्या बातम्या-

चंगू मंगूच्या फालतू गप्पा, फुकट्या लोकांना बघायला इंटरेस्ट नाही; मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवर निलेश राणेंची टीका

पुण्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ; पुन्हा आढळले 1 हजारांहून अधिक रूग्ण

जास्त अंगावर आलात तर…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

“गरज पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू”

आम्ही सुपारी घेणारे, मग तुम्ही हप्ते घेणारे आहात का?; मनसेचा शिवसेनेला सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या