पुणे | एकीकडे स्त्री भ्रूण हत्येविरोधात जनजागृती केली जात असताना स्त्री जातीच्या अर्भकाला कुठे रस्त्यावर तर कुठे कचऱ्यात तर कुठे चेंबरमध्ये फेकून दिल्याच्या माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समोर येत आहेत.
पुण्यात एका चेंबरमध्ये अर्भक सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात पालिकेच्या सफाई कामगारांना चेंबरमधील गाळ काढताना हे अर्भक सापडल्याची माहिती आहे. आज सकाळी लोहियानगर झोपडपट्टीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हे अर्भक टाकून देण्यात आल्यानं नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. या घटनेची नोंद पुणे पोलिसात झाली आहे. अर्भकाला टाकून देणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच अज्ञात पालकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं कळतंय.
दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांना सकाळी काम करताना हे अर्भक सापडलं. कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत कळवल्याचं समजतंय.
ट्रेंडिंग बातम्या-
देशातील सर्व बॉम्बस्फोटांमध्ये आरएसएसचा हात- निवृत्त न्यायाधीश
देवेंद्र फडणवीसांचा खास माणूस झाला भाजपचा पुणे शहराध्यक्ष!
महत्वाच्या बातम्या-
इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला- जितेंद्र आव्हाड
‘इंद्रायणी थडी’त होणार रमाबाई आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण!
सरपंचाची थेट निवडणूक पद्धत रद्द; ठाकरे सरकारचा निर्णय
Comments are closed.