Pune News l पुण्यातील (Pune) राम टेकडी (Ram Tekdi) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने रागाच्या भरात प्रेयसीच्या (Girlfriend) दोन गाड्या (Vehicles) जाळून टाकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रेयसी आरोपीशी बोलत नव्हती. हाच राग मनात धरून आरोपीने बुधवारी प्रेयसीला भेटायला बोलावले. यानंतर आरोपीने प्रेयसीची गाडी पेटवून दिली. ही धक्कादायक घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून गुन्हा (FIR) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमजद पठाण (Amjad Pathan) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. तो वानवडी (Wanwadi) परिसरात राहतो आणि एका सुरक्षा एजन्सीमध्ये (Security Agency) बॉडीगार्ड (Bodyguard) म्हणून काम करतो. पीडित महिला (Victim Woman) देखील याच एजन्सीमध्ये बॉडीगार्ड म्हणून काम करते. एकत्र काम करत असताना दोघांचे प्रेमसंबंध (Love Affair) जुळले होते. काही दिवस रिलेशनशिपमध्ये (Relationship) राहिल्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला. महिलेने आरोपीशी बोलणे बंद केले. यामुळे आरोपीचा प्रेयसीवर राग होता.
Pune News l भेटायला बोलावून पेटवली स्कूटी, शेजारी उभी असलेली दुसरी गाडीही जळाली :
दरम्यान, आरोपीने गुरुवारी पहाटे प्रेयसीला भेटायला बोलावले होते. त्यानुसार प्रेयसी पुण्यातील विवेकानंद नगर (Vivekanand Nagar) परिसरात आरोपीला भेटायला गेली होती. याठिकाणी दोघांमध्ये वाद (Argument) झाला. प्रेयसीने आरोपीसोबत असलेले संबंध तोडले आणि ब्रेक अप (Break Up) झाल्याचे आरोपीला सांगितले. या प्रकारानंतर संतापलेल्या आरोपीने प्रेयसी ज्या स्कूटीवरून (Scooty) भेटायला आली होती, त्या स्कूटीला आग (Fire) लावली. यावेळी बाजूलाच उभी असलेली दुसरी एक गाडीही जळाली आहे. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी प्रेयसीचा नवरा (Husband) देखील घटनास्थळी असल्याची माहिती मिळत आहे. दुसरी जळालेली गाडी प्रेयसीच्या नवऱ्याची असल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या गाडीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी अमजद पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.