पुणे महाराष्ट्र

पुण्यातील आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

पुणे | पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेले मराठा आंदोलन संपल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले. आंदोलकांनी जिल्हाधिकार्यालयाची तोडफोड केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनाचे निवेदन स्वीकारावं अशी आंदोलकांची मागणी होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन न स्वीकारल्याने आंदोलक आक्रमक झाले. त्यानंतर आंदोलक कार्यालयाच्या गेटवर चढले. तसंच आंदोलकांनी गेटवरील दिवे फोडत कार्यालयाची तोडफोड केली आहे.

दरम्यान, आक्रमक आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिस आले असता आंदोलकांनी पोलिसांवर चप्पल बूटही फेकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!

-मराठा आंदोलनात अजित पवार सामिल; शरद पवारांच्या घरासमोर केलं ठिय्या आंदोलन

-विधानभवनाच्या गेटवरच आमदार प्रकाश आबिटकरांचा ठिय्या!

-अॅट्रॉसिटीबाबत सर्व पक्ष गप्प का?

-औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक; रस्त्यावर टायर पेटवलं!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या