बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात बापानं 2 पोरींवर ट्रक चढवला अन् स्वतःलाही संपवलं, कारण अत्यंत धक्कादायक

पुणे | कोरोनाचे महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असताना पुण्यातही धक्कादायक चित्र आहे, अशा परिस्थितीत एका बापानंच आपल्या दोन मुलींची आत्महत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याच्या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यातील इंदोरी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

मोठ्या मुलीचे प्रेमसंबंध सुरु असल्याचा संशय बापाला होता. त्यामुळे पोटच्या दोन मुलींच्या अंगावर ट्रक घालून बापाने बापाने त्यांची हत्या केली आणि त्यानंतर त्याच ट्रकखाली स्वतः आत्महत्या केली. पुण्याच्या मावळमध्ये मध्यरात्री एक वाजता हा धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे.

मोठ्या मुलीचे कुणाशीतरी प्रेमसंबंध सुरू आहेत आणि ती व्हॉट्सअपद्वारे त्या मुलाशी संवाद साधते, असा संशय बापाला आला होता. या संशयावरून निर्दयी बापाने अख्खंच्या आख्खं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाची बाब म्हणजे याच कुटुंबाती लहान मुलगी आणि त्याची पत्नी यामधून बचावले आहेत.

भरत भराटे असं निर्दयी बापाचं नाव आहे. त्याने 18 वर्षाच्या नंदिनी आणि 14 वर्षाच्या वैष्णवी या दोन मुलींची हत्या केली आहे. हत्या करण्यापूर्वी त्याने एक चिट्टी देखील लिहून ठेवली आहे. त्यात मुलीच्या प्रेमसंबंधांचा उल्लेख करत अख्खंच्या कुटुंब संपवत असल्याचं नमूद केलेलं आहे.

भराटे कुटुंबं मूळचं सोलापूर जिल्ह्यातील आहे, मात्र सध्या ते मावळ तालुक्यातील इंदोरी गावात राहत होते. गावातील एका छोट्याशा घरात त्यांचं वास्तव्य होतं. त्यांच्यापासून अंदाजे शंभर मीटर अंतरावर त्यांचे नातेवाईकही राहतात. भरत भराटे ट्रक चालवायचे तर त्यांची पत्नी देखील लगतच एका ठिकाणी कामाला जात होती. त्यांना एकूण तीन मुली होत्या, मात्र कोरोनामुळे शाळांना सुट्टी असल्यानं त्या घरीच होत्या.

दरम्यान, शनिवारी ( दि. 18 एप्रिल) रोजी दुपारी मोठी मुलगी नंदिनी मोबाईलवर चॅटिंग करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. व्हॉट्सअपवर ती एका मुलाशी संवाद साधत असल्याचं भरत यांनी पाहिलं. तेव्हा रागाच्या भरात त्यांनी मुलीला मारहाण केली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुलींची आई कामावरून तेव्हा पुन्हा भांडणं झाली.

मुलगी वाईट वळणावर गेली असा आरोप करत त्यांनी मुलीला मारहाण देखील केली. त्यानंतर रात्री सर्वांची जेवणं झाल्यानं भरत एका कागदावर काहीतरी लिहित होता. पत्नीनं काय लिहिताय असं विचारताच तो तिच्यावर डाफरला आणि नंतर त्याच कागदावर पत्नीला जबरदस्तीने सही करायला सांगितलं. पती चिडलाय हे पाहून पत्नीनेही त्या कागदावर सही केली.

हा सारा प्रकार घडल्यानंतर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सारे झोपे गेले. त्यानंतर काही वेळाने भरत उठला आणि दोन्ही मुलींना घेऊन घराबाहेर पडला. त्याची पत्नी घाबरली होती, मात्र मुलींना समजावण्यासाठी तो बाहेर घेऊन गेला असावा अशी समजूत झाल्याने त्या शांत राहिल्या. त्यानंतर ट्रकचा आवाज आल्याने त्या घराबाहेर आल्या तेव्हा दोन्ही मुली रस्त्यावर झोपलेल्या आणि बाप ट्रक चालवत होता.

पत्नीने भरतला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने तुही लहान मुलीला घेऊन इथं झोप असं तिला सांगितलं. मात्र घाबरलेल्या पत्नीनं आपल्या लहान मुलीसह नातेवाईकांच्या घराच्या दिशेने पळ काढला. नातेवाईकांपर्यंत पोहोचून त्यांना हा धक्कादायक प्रकार सांगेपर्यंत फार उशीर झाला होता. परत येऊन पाहिल्यावर त्यांना तिघांचेही मृतदेह पहायला मिळाले.

दरम्यान, तळेगाव एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती कळवण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा दोन्ही मुलींचे मृतदेह शेजारी शेजारी तर बापाचा मृतदेह तिथून सात ते आठ फुटांवर होता. मुलींच्या आईनं घडलेला सारा प्रकार पोलिसांना सांगितला तेव्हा पोलिसांना घटनाक्रमाचा उलगडा झाला. घटनास्थळावर पोलिसांना मुलीच्या बापानं लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयावरुन संपूर्ण कुटुंबाला संपवायला निघालेल्या या बापाच्या कृत्यानं परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“हे कृत्य करून तुम्ही चुकलात…याची किंमत मोजावी लागणार”

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

देवेंद्र फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये- एकनाथ खडसे

दिवसभरात फक्त 2 लवंग खा… होतील विश्वास बसणार नाहीत इतके फायदे

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई होणार?

“जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More