पुणे महाराष्ट्र

पुण्याच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आणि शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे | कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत आपण केलेल्या टेस्टिंग लॅबच्या मागणीवर सकारात्मक पावले उचलायला सुरुवात झाली असून पुणे महापालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ससूनमध्ये नव्याने टेस्टिंग मशीनची खरेदी केली जाणार आहे.

याचा फायदा पुणे शहराची टेस्टिंग क्षमता वाढवण्यास मदत होणार आहे. याबाबतच्या तांत्रिक प्रक्रियाही वेगाने पूर्ण केल्या जाणार असून निधी राज्य सरकार आणि आपली पुणे महापालिका उभारणार आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री तसंच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्याच्या कोरोना स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जेवढा पाहिजे तेवढा निधी मागा परंतू पुण्याची कोरोनास्थिती आटोक्यात आणा. त्यासंबंधी कडक पावलं उचला तसंच कंटेन्मेंट झओनमध्ये कोटेकोरपणे नियम पाळले गेले पाहिजेत, अशा सूचना अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

दरम्यान, नव्या टेस्टिंग लॅबची मागणी आणि सद्यस्थिती यावरही बैठकीत पालकमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती महापौर मोहोळ यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत

“आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”

महत्वाच्या बातम्या-

भाजपची कृती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच- सचिन सावंत

…म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेतोय; हर्षवर्धन जाधव यांचा खुलासा

‘या’ नेत्याने जाहीर केली राजकीय निवृत्ती; राजकीय वर्तुळात खळबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या