बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्याच्या महापौरांच्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘इथं’ ठरले लखपती!

पुणे | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे  देशातील सर्वाधिक लोकप्रिय महापौर ठरले आहेत. समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात सक्रिय राहून जनसंपर्क व्हावा हा हेतू ठेवून मुरलीधर मोहोळ यांनी मोठ्या प्रमाणात ट्विटरचा वापर सुरू केला होता. त्यातच मोहोळ यांना नागरिकांनी अल्पावधीतच ट्विटरवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

मुरलीधर मोहोळ यांच्या पाठोपाठ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा नंबर लागतो. मुरलीधर मोहोळ यांनी एक लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एक लाखांचा टप्पा पार केल्यानंतर ट्विटरवर लखपती ठरलेल्या महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सोशल मीडिया हे लोकांशी संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. तसेच आपण महापौरपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून या माध्यमाचा वापर करण्यास सुरुवात केली, त्याला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला, त्याचाच परिणाम आता होत असताना पाहायला मिळतोय, असं मुरलीधर मोहोळ यांनी बोलून दाखवलं आहे.

सध्या मोहोळ यांनी 1 लाखांचा टप्पा ट्विटरवर पार केल्याने ते पहिल्या क्रमांकावर असले तरीही त्यांच्या जवळपासही दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या किशोरी पेडणेकर या नसल्याचं दिसून येत आहे. पेडणेकर यांच्यापेक्षा दुपटीने अधिक मोहोळ यांचे अनुसारक असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ यांचे फाॅलोअर्स हे फक्त पुण्यापुरते मर्यादित नसून ते संपुर्ण देशभरातील असल्याने आणखी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

“केबल कनेक्शन देण्याइतकं परबांना एसटीचं काम सोप्प वाटतं का?”

“वाह रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल”

मुंबईतील कोरोना आला आटोक्यात, वाचा आजची आकडेवारी

पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात

‘या’ बड्या शिवसेना नेत्यासह विश्वास नांगरे पाटीलही किरीट सोमय्यांच्या रडारवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More