Top News पुणे महाराष्ट्र

…तर जुलैअखेर रूग्ण संख्या ४७ हजारांच्या पुढे जाईल, पुणे महापौरांच्या सरकारकडे या महत्त्वाच्या मागण्या

पुणे | पुणे शहर आणि जिल्हा तसंच पिंपरी चिंचवडमध्ये वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या.

महापौरांनी राज्य सरकारकडे केलेल्या मागण्या खालीलप्रमाणे-

– आजचा रुग्ण दुपटीचा रेट पाहता जुलैअखेर रुग्णांची संख्या ४७ हजारांच्या पुढे जाईल, याचा विचार करता आयसोलेशन बेडस ६१४,आयसीयू बेड ४००,आणि व्हेंटिलेटर बेडस २०० ने कमी पडण्याची शक्यता आहे, तरी यासाठी राज्यसरकारने बेडसची उपलब्धता करून द्यावी.

– खाजगी लॅब व खाजगी हॉस्पिटल यांचा आणि महापालिकेचा समन्वय अधिक चांगला होणे गरजेचे आहे, यासाठी राज्य सरकारने भूमिका घ्यावी.

– महापालिकेच्या शहरी गरीब योजनेअंतर्गत ८० हॉस्पिटलना कोरोनाच्या उपचार करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दर महिन्याला २५ कोटींचा अतिरिक्त बोजा महापालिकेवर येणार आहे. पूर्वीचा १७५ कोटी आणि आत्ताचा २५ कोटी असा आर्थिक बोजा महापालिकेवर बसणार आहे, तरी राज्यसरकारने याबाबतीत विचार करण्याची गरज आहे.

– खाजगी लॅबच्या माध्यमातून स्वॅब तपासणीसाठी प्रतिरूग्ण १८०० रुपये महापालिका निधीतून उपलब्ध करून देणार आहे. टेस्टिंग क्षमता वाढविणे, महापालिकेच्या यंत्रणांमध्ये डॉक्टर, नर्सेस व पॅरामेडिकल स्टाफची आवश्यकता आहे, तरी ती तात्काळ पूर्ण करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

– आर्थिक परिस्थिती चांगला असलेला रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये टेस्टसाठी गेल्यानंतर रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर तीव्र, मध्यम लक्षणे आहेत ते न पाहता सर्व कुटुंबासाठी ४-५ बेडस पादाक्रांत करतात, त्यामुळे गंभीर रुग्णाला बेड मिळत नाहीत. यासंदर्भात खाजगी हॉस्पिटलला सूचना दिल्या पाहिजेत अशी भूमिका मांडली.

– आर्थिक क्षमता चांगली असणार्‍या नागरिकांनी, त्याचे रीपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेच्या क्वारनंटाईन सेंटर, आयसोलेशन सेंटरमध्ये भरती व्हावे, जेणेकरून खाजगी हॉस्पिटल मध्ये गंभीर रुग्ण व को – माॅबिड रुग्णांची खाजगी हॉस्पिटल जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून खाजगी हॉस्पिटलनी विचार करावा यासंबंधी सूचना मांडल्या.

बैठकीला मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर,जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड चे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, तसंच वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि अन्य महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत अजित पवार यांनी वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर नाराजी व्यक्त करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला. मुंबईमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते तर मग पुण्यात काय अडचण आहे? मी तुम्हाला आता एकदाच सांगतोय नाहीतर तुम्हाला परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट शब्दात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोनाविषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

ट्रेंडिंग बातम्या-

जवानांच्या हातात देश सुरक्षित, जगाला भारताच्या सामर्थ्याचे दर्शन, थेट सीमेवर जाऊन मोदींचं संबोधन

कोरोनाविरोधी लढ्यात पुणे महापालिकने टाकला टॉप गिअर, आता….

महत्वाच्या बातम्या-

पोलिस अधिकाऱ्यांच्या विभागीय परीक्षेसंदर्भात गृहमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

शाहिद आफ्रिदीची भारतीय लष्करावर टीका, म्हणाला…

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अनेकांची नावं समोर आली- अनिल देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या