Top News पुणे

धक्कादायक! पुण्याच्या महापौरांपाठोपाठ कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण

पुणे | देशासह राज्यभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढतेय. पुण्यातही रूग्णांचा आकडा वाढत असून पुण्याच्या महापौरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे महापौरांच्या पाठोपाठ त्यांच्या घरातील 8 जण कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यापाठोपाठ कुटुंबातील आठ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. महापौरांच्या घरातील आठ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे.

मुरलीधर मोहोळ यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची चाचणी करण्यात आली. त्यात आज त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महापौर मोहोळ यांच्यासह एकूण 9 जणांना कोरोना झाला आहे.

कालच्या दिवसांत पुण्यात गेल्या 24 तासांमध्ये 819 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. तर 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पंकजा मुंडे यांना केंद्रात ‘हे’ पद मिळण्याची शक्यता!

कोरोनाचा फास आवळला! भारत ‘या’ देशाला मागे टाकत पोहोचणार तिसऱ्या स्थानावर…

महत्वाच्या बातम्या-

वाट्टेल ती किंमत मोजून ठाकरे सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्यात, पण …- संजय राऊत

कोरोना संशयित रूग्णाचा मृतदेह तब्बल ३ तास एसटी आगारात पडला, लाजीरवाणं कृत्य…

BSNL चा नवा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन; दररोज मिळणार 5 जीबी डेटा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या