बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील लॉकडाऊनसंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा

पुणे | पुण्यात कोरोना विस्फोट झालेला पहायला मिळत आहे. रोजची कोरोनाबाधितांची आकडेवारी काळजाचा ठोका चुकवणारी आहे. अशा परिस्थितीत पुण्यात प्रशासनाने लावलेले निर्बंध कडक करण्यात आलेले आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात ट्विट करुन पुण्याच्या जनतेला पुन्हा एकदा

राज्य सरकारच्या निर्देशानुसार उद्यापासून पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद असणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणीही शहरात काटेकोरपणे केली जाणार आहे, असं ट्विट पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन तसेच रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याआधीच पुण्यात संध्याकाळी ६ वाजल्यापासून संचारबंदी सुरु करण्यात आली होती. महाराष्ट्रात निर्बंध लागल्यानंतर पुण्यातील निर्बंध जसेच्या तसे ठेवण्यात आले होते.

दरम्यान, जीवनावश्यक सेवा वगळून पुण्यातील सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. व्यापाऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता, मात्र मुरलीधर मोहोळ यांनी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकानं उद्यापासून बंद राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

पुण्याच्या महापौरांचं ट्विट-

थोडक्यात बातम्या-

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममधील मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

धक्कादायक! मित्रानेच केली मित्राची हत्या; कारण ऐकूण तुम्हीही व्हाल हैराण

धार्मिक नियमांचं पालन करत चेन्नईतील ‘या’ खेळाडूने मागितली वेगळी जर्सी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More