बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्याला अजून थेट केंद्राची मदत नाहीच, महापौरांचा ‘तो’ दावा ठरला फोल

पुणे | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याला थेट केंद्राकडून कोरोना लसीचे साडेतीन लाख डोस मिळणार असल्याचा दावा केला होता, मात्र हा दावा फोल ठरलेला दिसत आहे. अजूनतरी पुण्याला केंद्राकडून कुठलीही थेट मदत मिळाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे, त्यामुळे लसीकरणाचं श्रेय घेण्याच्या नादात महापौरांकडून मोठी चूक झाल्याचं दिसत आहे.

महापौरांनी दावा केलेले साडेतीन डोस काही पुणे शहराला मिळाले नाहीत, मात्र पुणे जिल्ह्याला शनिवारी १ लाख डोस मिळाले आहेत. ही लस राज्याच्या कोट्यातून मिळाल्याचं समोर आलं आहे, महापौरांनी देखील हे मान्य केलं आहे. यातील ५० हजार डोस पुणे ग्रामीणसाठी २० हजार पिंपरी-चिंचवडसाठी देण्यात आली आहे, त्यामुळे यातील फक्त ३० हजार डोसच पुण्याला मिळाले आहेत.

दावा फोल ठरल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे त्यांनी या प्रकरणात बोट दाखवलं आहे. विभागीय आयुक्तांनी मला जी माहिती दिली तीच मी पत्रकार परिषदेत सांगितली, असं मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पुण्याला येत्या तीन दिवसांमध्ये साडेतीन लाख डोस मिळतील असं मला म्हणायचं होतं, अशी सारवासारव त्यांनी या प्रकरणी केली आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता इथं लसीकरण मोठ्या प्रमाणात होणं आवश्यक आहे त्यामुळे महापौरांनी दावा केल्याप्रमाणे येत्या तीन दिवसात केंद्राकडून हे तीन लाख लसीचे डोस थेट पुण्याला मिळतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोविड सेंटरमध्येच रेमडेसीवीरचा काळाबाजार, पोलीस कारवाईत धक्कादायक गोष्टी उघड

IPL 2021- …म्हणून हार्दिक पांड्याने पहिल्या सामन्यात बॉलिंग केली नाही

मद्यप्रेमींसाठी गुड न्यूज; उत्पादन शुल्क विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

14 व्या वर्षाच्या मुलीसोबत हैवानासारखं कृत्य, पत्नी देत होती दारावर पहारा

सेक्रेटरीची नोकरी सांगून तो सुंदर फोटो मागवायचा अन्… सेक्स रॅकेटमागचं धक्कादायक वास्तव उघड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More