बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे मेट्रोसंंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

पुणे | मेट्रो आता लवकरच पुणेेकरांसाठीही धावणार आहे. त्यादृष्टीने प्रशासन पाऊले उचलत असून याबाबत अजून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे इटलीत तयार झालेली 3 कोचची ट्रेन मुंबईत दाखल झालेली आहे आणि ती लवकरच पुणे शहरातही दाखल होणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.

पुणे मेट्रोसाठी 34 मेट्रो ट्रेनची ऑर्डर ही टिटागढ फिरेमा या कंपनीला देण्यात आलेली आहे. त्यानुसार 102 कोचचा पुरवठा कंपनी पुण्याला करणार आहे. मेट्रोशी झालेल्या करारानुसार सुरूवातीच्या काही ट्रेन या फिरेमा कंपनीच्या इटलीच्या कारखान्यात बनवण्यात येणार आहेत. तर याव्यतिरीक्त इतर ट्रेन या कोलकाताच्या कारखान्यात तयार होणार आहेत. त्यापैकी इटलीच्या कारखान्यात तयार झालेली पहिली ट्रेन मुंबईत दाखल झाल्याचं मोहोळ यांनी सांगितलं आहे.

मेट्रो ट्रेनच्या एका डब्याची प्रवाशी क्षमता ही 300 असणार आहे. यामध्ये 48 प्रवासी बसून प्रवास करू शकतील तर 250 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकणार आहेत. यातील एका ट्रेनला 3 तीन डबे असणार आहेत. ज्यातील 1 डबा हा महिलांसाठी राखीव असणार आहे. या प्रवासासाठी 10, 20, 30, 40, 50 रूपये या स्वरूपात टिकीट असणार आहे.

पुणे मेट्रो शहरातून 33.20 किलोमीटर अंतर धावणार आहे. या मार्गांमध्ये एकूण 30 स्थानकांचा समावेश आहे. शहरात सध्या मेट्रोचे काम 60 टक्के पुर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गासाठीचं मेट्रोचं काम हे 70 टक्के पुर्ण झाले आहे. या मार्गावरून धावणारी पहिली मेट्रो ट्रेन यावर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.


थोडक्यात बातम्या-

”अंधार आणखी गडद होणार असेल तर हा बदलत्या देशाचा नवा विकास म्हणायचा का?”

राहुल गांधी, प्रियंका गांधी अखेर लखीमपूर पीडित कुटुंबीयांच्या भेटीला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘या’ ठिकाणी मुसळधार पावसानं घर कोसळून पाच जण ठार

लखीमपूर प्रकरणात मोठी घडामोड,सर्वोच्च न्यायालयाची गंभीर पावलं; सरकारच्या अडचणी वाढणार?

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा; सरकारकडून मदत जाहीर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More