Pune Metro News l पुणेकरांच्या (Punekar News) सेवेत असलेली पुणे मेट्रो आता प्रजासत्ताक दिनापासून (Republic Day) आणखी एक तास अधिक धावणार आहे. वाढती प्रवासी संख्या आणि प्रवाशांची आग्रही मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. रविवार, दिनांक 26 जानेवारीपासून मेट्रो रात्री 10 ऐवजी 11 वाजेपर्यंत प्रवाशांच्या सेवेत असणार आहे.
मेट्रो प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासोबतच, “एक पुणे ट्रान्झिट कार्ड” (Ek Pune Transit Card) अवघ्या 20 रुपयांत उपलब्ध करून दिले जाणार आहे, हे विशेष.
प्रवासी सेवेत वाढ :
सध्या पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवरील प्रवासी सेवा सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू आहे. मात्र, 26 जानेवारीपासून ही सेवा रात्री 11 वाजेपर्यंत वाढवण्यात येत आहे. गर्दीच्या वेळी, म्हणजेच सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत मेट्रोची वारंवारता 7 मिनिटांची राहील. तर कमी गर्दीच्या वेळी, म्हणजेच सकाळी 6 ते 8, सकाळी 11 ते दुपारी 4 आणि रात्री 8 ते 10 या वेळेत मेट्रोची वारंवारता 10 मिनिटांची राहील.
आता रात्री 10 ते 11 या वाढीव वेळेत मेट्रो दर 15 मिनिटांनी धावेल. या निर्णयामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत आणि पर्यायाने उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास महामेट्रोचे (Mahametro) व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (Shravan Hardikar) यांनी व्यक्त केला आहे.
Pune Metro News l प्रवाशांना दिलासा आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय :
“पुणे मेट्रोचा वाढता वापर लक्षात घेऊन आणि प्रवाशांच्या आग्रहास्तव मेट्रोने आपल्या प्रवासी सेवेत वाढ केली आहे. रात्री कामावरून उशिरा घरी जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. वेळेवर पोहोचणार आणि सुरक्षित असा सार्वजनिक वाहतूक पर्याय यामुळे नागरिकांना उपलब्ध होणार आहे,” असे श्रावण हर्डीकर म्हणाले.
मेट्रोच्या या निर्णयामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिला, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठा फायदा होणार आहे. सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाल्याने पुणेकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
News Title : Pune-Metro-Service-Extended-Till-11PM-From-Republic-Day