Pune News l गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील अनेक मेट्रो स्थानकांच्या नावावरून आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून पुणे शहरातील काही मेट्रो स्थानकांची नावे बदलण्याची मागणी केली जात होती. अशातच आता यासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. यामध्ये पुणे शहरातील तीन स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत. तर जाणून घेऊयात नेमकी कोणत्या स्थानकांची नावे बदलणार आहेत?
पुण्यातील ‘या’ तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार :
पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरातील तीन मेट्रो स्थानकाचे नाव बदलण्यासंदर्भात माहिती दिली आहे. यामध्ये शहरातील मंगळवार पेठ, बुधवार पेठ आणि नाशिक फाटा या तीन स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत. तसेच या नामांतराची प्रक्रिया देखील पूर्ण झाली असून याबाबतचे गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
या नामांतरानंतर बुधवार पेठ स्थानकाचे नाव हे कसबा पेठ स्थानक ठेवण्यात येणार आहे. तसेच मंगळवार पेठ या स्थानकाचे नाव आरटीओ स्थानक आणि नाशिक फाटा स्थानकाचे नाव कासारवाडी असे मंजूर करण्यात येणार आहे. यासंदर्भात तसा प्रस्ताव देखील केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. तसेच सिव्हिल कोर्ट स्थानकाचे नाव शिवाजीनगर जिल्हा न्यायालय करण्यास केंद्र सरकारने मान्यता देखील दिली आहे.
Pune News l काय म्हणाले खासदार मुरलीधर मोहोळ? :
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आज स्वारगेट मेट्रो स्टेशनची पाहणी केली आहे. यामध्ये स्वारगेट मेट्रो स्टेशन हे भूमिगत असून ते मल्टी मॉडेल हब म्हणून ओळखलं गेलं आहे. तसेच अत्यंत अत्याधुनिक आणि अद्यावत पध्दतीने हे मेट्रो स्टेशन लवकरच प्रवशांसाठी खुलं देखील करण्यात येणार आहे.
याशिवाय स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे देखील भूमिपूजन सोहळा पार लवकरच पडेल असा विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वर्तवला आहे.
News Title : Pune Metro Station Renamed
महत्त्वाच्या बातम्या-
… तर यापुढे अहमदनगर नव्हे तर ‘अहिल्यानगर’; नामांतरास ग्रीन सिग्नल
टाटा कंपनीची भन्नाट कार बाजारात लाँच; किंमत असणार फक्त…
रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 11 हजारांहून अधिक जागांवर होणार भरती, असा करा अर्ज
“फोटोंना काय जोडे मारता, हिम्मत असेल तर समोर येऊन..”; अजित पवारांचं थेट आव्हान
… या नित्या राणेचा बंदोबस्त करा नाहीतर.., ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा इशारा