बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांची प्रतिक्षा संपणार! नव्या वर्षात पुणे मेट्रो सेवेत दाखल होणार

पुणे | पुणेकरांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. पुणे मेट्रोचे दोन मार्ग नव्या वर्षात पुणेकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रोच्या दोन प्राधान्यमार्गाच्या कामाचा आता अंतिम टप्पा शिल्लक राहिला आहे. उर्वरीत काम आणि कामाची एकंदर गती बघता नव्या वर्षात या दोन्ही मार्गावरून मेट्रो धावेल, अशी माहिती समोर येत आहे.

पुणे मेट्रोचे परिचालन आणि यंत्रणा संचालक विनोद कुमार अग्रवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. पुणे महापालिका हद्दीतील वनाज ते गरवारे महाविद्यालय तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील तुकारामनगर ते फुगेवाडी हे दोन्ही महत्वाचे मार्ग नव्या वर्षात पुणेकरांच्या सेवेत असतील, असा विश्वास विनोद कुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला आहे.

पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि कात्रज ते निगडी या दोन मार्गांचं एकत्रितरित्या 65 टक्के काम पुर्ण झालं आहे. तर या मार्गाचं उर्वरीत काम 31 डिसेंबरपर्यंत पुर्ण करण्याचं सध्या नियोजन आहे. मेट्रोचं सर्व काम पुर्ण झाल्यानंतर केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून या मार्गाची पाहणी केली जाणार आहे, असंही विनोद कुमार अग्रवाल यांनी सांगितलं आहे.

या दोन्ही मार्गांचे सिव्हिल वर्क पुर्ण झाले असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली आहे. तर यासोबत रूळ टाकण्याचं तसेच विद्युत पुरवठ्यांच्या तारा जोडणे, सिग्नल यंत्रणा आणि स्थानकांची अशी इतर कामं वेगाने सुरू आहेत. ही कामं जास्त वेगाने कशी होतील, याचं नियोजन सुरू आहे आणि ही सर्व कामं एकाच वेळी पुर्ण व्हावी यासाठी 10 वेगवेगळे विभाग कार्यरत असल्याची माहितीही अग्रवाल यांनी दिली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

आता ‘या’ प्रवाशांना मिळणार लोकल प्रवासाची मुभा; राज्य सरकारची मागणी झाली मान्य

‘त्याच्या उत्पन्नातून एसटी महामंडळ चालु शकते एवढं त्याने कमावलंय’, राणेंचा पुन्हा एकदा वार

“शंभरपेक्षा जास्त लोकांना अडकवलंय, आता त्यांचा पर्दाफाश मी करणार”

रजनीकांत पुढचे काही दिवस रूग्णालयातच; तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर

…तर या कायद्याप्रमाणे वानखेडेंची चौकशी होणार, धनंजय मुंडेंचं मोठं विधान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More