पुणे महाराष्ट्र

“महापौर साहेब इंग्रज होऊ नका, गणेश विसर्जन घाटावरच करणार”

पुणे | कोरोनामुळे पुण्यात जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गणेशोत्सवावर अनेक निर्बंध लावले आहेत. यानुसार गणेश विसर्जन सार्वजनिक स्थळांवर करण्यास बंदी असणार आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याला विरोध केला आहे. महापौर साहेब इंग्रज होऊ नका, असं म्हणत मनसेने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर सडकून टीका केली आहे.

कोरोनाचं संकट जगावर आहे तसंच देशावर आणि महाराष्ट्रावरही आहे. पण महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात हा कोरोना केवळ देवदेवतांच्या मागे लागला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काल परवा आपण पुणेकरांना गणपतीमूर्तीच्या साईज ठरवून देत गणेश मूर्ती घरातच विसर्जित करायचं बंधन घातलं. मात्र, इंग्रजांच्या काळातही अशी बंधनं घालण्यात येत नव्हती, असं मनसेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी महापौरांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

पुण्यामध्ये 1897 मध्ये प्लेगची साथ होती. त्यावेळी प्लेगच्या नावावर इंग्रजांनी पुण्यातील घराघरात शोध मोहिम उघडली. या मोहिमेत इंग्रज देव्हाऱ्यापर्यंत पोहचले. त्यामुळे इंग्रजांविरुद्ध असंतोष पसरला आणि रँडचा वध करण्यात आला. आपण इंग्रज नाही आणि पुण्यातील तत्कालीन परिस्थिती देखील प्लेगसारखी नाही, असंही या निवेदनात म्हटलं आहे.

बालाजीपासून ओंकारेश्वरपर्यंत सगळी मंदिरं उघडली. तुम्ही सगळे मॉल उघडले, गर्दीची ठिकाणं सुरु केली. मद्यप्रेमींसाठी राज्य सरकारच्या कृपेने अगदी पोलीस बंदोबस्तात वाईन शॉप सुरु केले. मटणाच्या दुकानाबाहेर चार चार किलोमीटर रांगा लागल्या. आजही सर्व सुरु असून रस्त्यावर गर्दी आहे. मग देवांनाच बंधनं का? आधी देवळं बंद केली आता हिंदूच्या घरात घुसणार का?, असं अजय शिंदे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

शरद पवार आमचे कुटुंबप्रमुख, प्रत्येकाला सूचना देण्याचा त्यांना अधिकार- जयंत पाटील

पार्थला फटकारल्यानंतर अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट

मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शैक्षणिक मंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

शरद पवारांच्या कडवट टीकेवर पार्थ पवार यांची अतिशय सायलेंट प्रतिक्रिया…!

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात दीड हजारांहून जास्त रुग्ण आढळले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या