मुंबई | मुंबई पुणे नागपूरसह उर्वरित महाराष्ट्रात कोरोना आता अधिक वैगात फैलावत आहे. लॉकडाऊन असून देखील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता महत्त्वाचा आदेश जारी केला आहे.
ज्या शहरांमध्ये कोरोनाचा रूग्ण असेल अशा शहरांमधल्या नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क लावणे अनिवार्य असणार आहे. जर अत्यावश्यक सेवेसाठी किंवा तुमच्या गरजेच्या कामासाठी उदा. किराणा दुकानात जाणे, मेडिकलमध्ये जाणे किंवा भाजीपाला आणण्यासाठी जाणे. याकरिता जेव्हा तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर मास्क असणं गरजेचं आहे. जर मास्क नसेल तर शासन आता त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक तसंच ज्या ज्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रभाव आहे त्या शहरामधल्या नागरिकांनी सरकारी सूचनांचं पान करावं अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा गृहमंत्री देशमुख यांनी दिला आहे.
दरम्यान, पुणे आणि मुंबईत परिस्थिती अधिक चिंताजनक होत चालली आहे. मुंबईत दिवसागणिक कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तर काल पुण्यात एकाच दिवसांत 8 व्यक्ती कोरोनाने मृत्यूमुखी पडल्या आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची कोरोना टेस्ट; आला हा रिपोर्ट
राज्यातील मंत्र्यांमध्ये समन्वय दिसत नाही- देवेंद्र फडणवीस
महत्वाच्या बातम्या
मुंबईत वाढता कोरोनाबाधितांचा आकडा; महापालिका दक्षिण कोरियाकडून विकत घेणार 1 लाख किट्स
मनसे जितेंद्र आव्हाडांच्या पाठिशी
हा कोरोना पसरवतोय म्हणत तबलिकी जमातच्या एकाला बेदम मारहाण; रूग्णालयात मृत्यू
Comments are closed.