New Rule l गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कारने दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली आहे. यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अशातच आता शासनाने मद्यप्रेमींसाठी नवीन नियम तयार केले आहे. यामुळे आता पब अन् बार मालकांनी देखील पुढाकार घेतला आहे.
पब अन् बार मालकांनी घेतला मोठा निर्णय :
पुणे शहरातील मालकांनी घेतला मोठा निर्णय कल्याणीनगर भागात पोर्श कार अपघात प्रकारानंतर आता बार अन् पबमध्ये मद्य पिण्यासाठी बदल करण्यात आले आहेत. पुण्यात अल्पवयीन मुलाने मद्याच्या नशेत भरधाव कार चालवत दोन तरुणांना उडवले होते. त्यानंतर या प्रकरणात अनेक बाजू समोर आल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अन् प्रशासनाकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु नागरिकांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे. त्यामुळे या प्रकरणात तब्बल नऊ पेक्षा अधिक लोकांना अटक झाली होती.
तसेच या प्रकरणात पोलीस अन प्रशासनावर देखील सडकून टीका झाली आहे. त्यामुळे प्रशासनासोबतच पब अन् बार चालक देखील अलर्ट मोडवर आले आहेत. आता पब अन् बार चालक यांनी देखील कठोर नियमावली तयार केली आहे. यामुळे मुंबई अन् पुण्यात मद्य अन् वाईन पितांना वयाचा पुरावा देणे बंधनकारक असणार आहे.
New Rule l नेमका नियम काय आहे? :
राज्यातील या घटनेमुळे पुणे, मुंबई व नागपूरसारख्या मोठ्या शहरात मद्याच्या नशेत अल्पवयीन मुलांकडून वाहने भरधाव वेगाने चालवण्याचे अनेक प्रकार वारंवार उघड होत असतात. त्यामुळे आता मुंबई व पुण्यात बार अन् पबमध्ये दारु पिण्यापूर्वी वयाचा पुरावा तपासला जाणार आहे. यामध्ये सरकारी ओळखपत्रातील वय ग्राह्य धरले जाणार आहे. तसेच अल्पवयीन मुलांना बार अन् पबमध्ये प्रवेश मिळू नये यासाठी एंट्री वेळीच ओळखपत्र तपासले जाणार आहेत.
नियमावलीनुसार, वाईन अन् बियर पिण्यासाठी 21 वर्ष वय पूर्ण असावे लागणार आहे. याशिवाय दारू पिण्यासाठी 25 वर्ष वय बंधनकारक असणार आहे. तसेच अनेक पब चालकांनी ओळखपत्र दाखवल्याशिवाय दारू न देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. पब अन् बार चालकांच्या या नियमानुसार राज्यातील दुर्घना देखील कमी होण्यास मदत होणार असल्याचं बोललं जात आहे.
News Title – Pune, Mumbai Proof Of Age Will Be Required To Drink Liquor In Bars And Pubs
महत्त्वाच्या बातम्या
राज्यातील ‘या’ जिल्ह्याला यलो अलर्ट; तर इतर जिल्ह्यात कसे असणार वातावरण
ओबीसी समाज एकवटला; 57 लाख बोगस कुणबी नोंदी तातडीने रद्द करा,अन्यथा…
महाराष्ट्रात एनडीएला कमी जागा का मिळाल्या? रामदास आठवलेंनी केला मोठा दावा
…म्हणून महाविकास आघाडीला यश मिळाले; एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण
आज या राशीच्या व्यक्तींनी प्रवासात सावधानता बाळगावी