आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

कोरोनाचा पुण्याला दिलासा, मात्र मुंबईत आज धक्कादायक आकडा

मुंबई | राज्यातील कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस चिंताजनक बनत असल्याचं चित्र आहे, मात्र त्यातल्या त्यात आज पुण्याला कोरोनाच्या आकड्यानं दिलासा दिला आहे तर दुसरीकडे मुंबईसाठी मात्र आजचा कोरोनाचा आकडा धक्कादायक आहे.

राज्यात कोरोनाचा सर्वाधिक कहर मुंबईत पाहायला मिळतो आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून येत आहेत. मुंबईत वाढत जाणारी रुग्णांची संख्या ही चिंतेचा विषय बनली आहे.

मुंबईत आज कोरोनाचे १४१३ रुग्ण वाढले आहेत, तर आज एकाच दिवसात ४० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४० हजार ८७७ वर पोहोचली आहे. देशात मुंबई हा कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनली आहे.

दुसरीकडे, आज पुण्यातला कोरोनाबाधितांचा आकडा कमी आला आहे. आज पुण्यात ५७ रुग्णांची नोंद झाली. आता पुण्याची एकूण रूग्णसंख्या ६५२९ वर पोहचली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

खडकवासल्यातून मलाच उमेदवारी मिळणार होती, मात्र… रुपाली चाकणकरांचा मोठा खुलासा

गुडन्यूज! पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, आज सापडले फक्त एवढे रुग्ण

महत्वाच्या बातम्या-

चित्राताईंनी पक्ष सोडल्यानं प्रदेशाध्यक्षपद मिळालं त्यांचे आभार मानाल का?, चाकणकर म्हणतात…

आम्हाला सलून उघडायला परवानगी द्या, नाहीतर….; सलून व्यावसायिक आक्रमक

पक्षाला मिळालेल्या यशात आमचा थोडा तरी वाटा असेल ना?; सत्यजित तांबेंचं कार्यकर्त्यांची खदखद मांडणार पत्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या