Top News पुणे महाराष्ट्र

आर्थिक संकटात सापडलेल्या पुणेकरांना महापालिकेने दिली आनंदाची बातमी!

पुणे  | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मिळकत कर भरण्यासाठी आज (31 मे) शेवटचा दिवस असून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठा दिलासा देण्यासाठी ही मुदत 30 जूनपर्यंत वाढण्यात आली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या संदर्भातील आदेश महापौर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहेत.

यासाठीची स्थायी समितीची आणि सर्वसाधारण सभेची मान्यता देण्यात येईल, असंही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केलं आहे. मिळकत कर भरण्यास एक महिन्याचा कालावधी मिळाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लॉकडाऊनमुळे काही पुणेकरांना मिळकत कर भरणे शक्य झाले नव्हते. शिवाय शनिवारी ऑनलाईन भरण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय आहे. ‘लॉकडाऊनच्या काळात काही पुणेकरांना मिळकत कर भरणे शक्य झाले नाही. या संकटाच्या काळात पुणेकरांना दिलासा मिळावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे, असं महापौर मोहोळ यांनी सांगितलं.

आतापर्यंत पुणेकरांनी 300 कोटींच्या आसपास कर भरला आहे. गेल्या वर्षी कर भरणा करण्याकरिता 31 मेपर्यंतची मुदत होती. गेल्या वर्षी 31 मेपर्यंत 650 कोटींचा कर जमा झाला होता. आता या मुदतवाढीने कर भरणा वाढण्यास मदतच मिळेल. त्याचा सकारात्मक परिणाम उत्पन्न वाढीवर होईल. या निर्णयासंदर्भात महापालिका पदाधिकारी आणि सर्वपक्षीय गटनेत्यांशीही चर्चा झाली आहे,  असंही महापौरांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

वाढदिवसानिमित्त रूपाली चाकणकरांचं कार्यकर्त्यांना विशेष आवाहन

सॅनिटायझरचा अतिवापर करत असाल तर सावधान; होऊ शकतो ‘हा’ धोका!

महत्वाच्या बातम्या-

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

पीएम केअर फंडला भरभरुन मदत; मात्र त्याबद्दल माहिती द्यायला पीएमओचा नकार

‘…म्हणून शिवसेना आज भाजपसोबत नाही’; संजय राऊत यांनी सांगितलं खरं कारण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या