Top News पुणे महाराष्ट्र

अजित पवारांच्या सूचनेनंतर पुण्याचे विभागीय आयुक्त ‘इन अ‌ॅक्शन मोड!’

पुणे | पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त यांनी नवे आदेश काढले आहेत. विभागीय आयुक्तांनी बेजबाबदार नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

शंभरहून अधिक बाधित क्षेत्रामध्ये शासनाच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आलं आहे. त्यानुसार नियमांचं उल्लंघन करणारे नागरिक, बेजबाबदार दुकानदार यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी काढले आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार कडक निर्बंध राबवा त्यानुसार मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले होते. पुणे शहर आणि जिल्हा तसंच पिंपरी चिंचवडमध्ये वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत अजित पवार यांनी वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर नाराजी व्यक्त करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला होता. त्यानंतर आता विभागीय आयुक्तांनी बेजबाबदार नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

बाजारपेठांमधील दुकाने घडण्याला प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत. परंतू काही दुकानदार मात्र हे नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत. अश्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. तसंच चौकामध्ये बसून गप्पा मारणे, एकत्रित बसून पत्त्या खेळणे, मास्कशिवाय जे नागरिक फिरतायेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

आम्‍ही अनुभवलेली आगळी-वेगळी आषाढी वारी!

कठीण परिस्थितीत उद्योगांनी कामगारांच्या नोकऱ्या घालवू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

हे सरकार नाही तर सर्कस आहे, नितेश राणेंचा महाविकास आघाडीवर टीकेचा बाण

मास्क घातला नाही तर 10 हजार रूपये दंड, ‘या’ राज्य सरकारने घेतला निर्णय

शिवसेना-राष्ट्रवादीत फोडाफोडीचं राजकारण; पारनेरमध्ये शिवसेनेला, कल्याणमध्ये राष्ट्रवादीला दणका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या