बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

होम आयसोलेशन बंद या राज्य सरकारच्या निर्णयावर पुणे महापालिकेने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

पुणे | महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपुर्ण राज्यभरात लाॅकडाऊन घोषित केला आहे.  लाॅकडाऊनमुळे काही प्रमाणात कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र दिसुन येत आहे. पण होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रूग्णांमुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन हा पर्याय रद्द करण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र सरकारने घोषित केला. परंतु, हा निर्णय पुणे शहरासाठी बंधनकारक नसल्याचा खुलासा पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केला आहे. ज्यांच्या घरी राहण्याची सोय आहे, अशा सौम्य कोरोनाची लक्षणं असलेल्या नागरिकांंनी कोविड सेंटरला भरती होण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रूग्णांना घरीच आयसोलेशनमध्ये राहण्याची परवानगी देण्यात येत होती. पण, हातावर शिक्का असतानाही हे रूग्ण बाहेर फिरत असल्याने ते सुपरस्प्रेडर ठरण्याची दाट शक्यता असल्याने आणि अनेकांच्या घरी शौचालय नाही तर काही लोक एकाच खोलीत राहत असल्याने इतर कुटुंबियांनाही त्याचा धोका होऊ शकतो, त्यामुळे राज्य सरकारने होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेतला.

पुणे शहरातील सौम्य लक्षणं असलेल्या रूग्णांना शासनाचा आदेश प्राप्त होईपर्यंत घरीच उपचार घेण्यास मुभा आहे. तसेच शासन निर्णयाची प्रत प्राप्त झाल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असं महापालिकेकडुन स्पष्ट करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोर घेतला शेवटचा श्वास; ह्रदय पिळवटून टाकणारी घटना!

…..म्हणून लसीकरण प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर करु नका

तहानलेल्या गरूडाची तरूणाने अशा पद्धतीने भागवली तहान, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘उद्धव, मी तुझी शिक्षिका…’; उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटलांना शिकवलेल्या शिक्षिकेची आर्त हाक!

आनंदाची बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; सक्रिय रूग्णसंख्याही घटली

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More