वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
पुणे | पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये तसंच त्यांना बेड मिळावे, यासाठी महापालिका पुन्हा कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे.
पुणे महापालिकेनं खासगी रुग्णालयांना बेडसंदर्भात सूचना देताना शहरातील 50 टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. खाजगी रुग्णालय प्रमुखांशी झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी शहारातील रुग्णालयांना अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत.
खासगी रुग्णालयातील बेडची माहिती डँशबोर्डवर अपडेट करणं बंधनकारक करण्यात आली आहे. तसंच कोरोना रुग्णाला खाजगी रूग्णालयानं प्रवेश नाकारल्यास महापालिका करणार कारवाई आहे. त्यामुळे कोणत्याही कोरोना रुग्णाला नाकारण्याचं धाडस खासगी रुग्णालयांनी करु नये, अशी तंबी पालिका आयुक्तांनी दिली आहे.
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. काल तर एकाच दिवशी जवळपास कोरोनाचे सातशे रुग्ण आढळून आले आहेत.
थोडक्यात बातम्या-
सुप्रसिद्ध PK सिनेमाचा सिक्वेल येणार; आमीरच्या जागी ‘हा’ अभिनेता मुख्य भूमिकेत!
‘सत्तेसाठी भाजप कोणतीही तडजोड करतोय’; ‘या’ भाजप नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
बीडमध्ये मंगलाष्टकांऐवजी वंदे मातरम या गीतावर पार पडला विवाह, धनंजय मुंडे म्हणाले….
“स्वच्छ चारित्र्याचे असतील तर ते लपले कशाला?”
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला बाथटबमधील फोटो!
Comments are closed.