बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता विद्यार्थ्यांना मिळणार 51 हजार रुपये, वाचा सविस्तर माहिती

पुणे | 10 वी 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पुणे महानगरपालिकेने (Pune Corporation) एक बक्षिस देण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना 51 हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. 80 ते 85 टक्क्यांच्या वर गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना महानगरपालिकेकडून ही रक्कम देण्यात येणार आहे.

10 वी 12 वीच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शारदाबाई पवार योजनेअंतर्गत ही रक्कम देण्यात येणार असल्याची घोषणा स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी केली आहे. यावेळी रासने यांनी सांगितलं, 10 वीच्या 158 विद्यार्थ्यांना आणि 12 वीच्या 303 विद्यार्थी असे एकूण 461 विद्यार्थ्यांना ही रक्कम देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी अंदाजपत्रकात एक कोटी पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना वाटण्यात येणाऱ्या रकमेसाठी 2 कोटी 35 लाख 11 हजार रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे उर्वरित एक कोटी रुपयांची रक्कम पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मोफत बससेवेच्या तरतूदीतून देण्यात येणार आहे, अशी माहिती देखील हेमंत रासने यांनी दिली आहे.

यावर्षी कोरोनामुळे (Corona) पहिल्या सत्रात शाळा बंद असल्याने अंदाजपत्रकातील बहुतांश रक्कम शिल्लक आहे. 7 कोटी रुपयांपैकी बहुतांश रक्कम शिल्लक असल्याने त्यापैकी एक कोटी रुपयाचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचं हेमंत रासने यांनी सांगितलं आहे. महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मात्र प्रेरणा मिळणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

नवाब मलिकांच्या अडचणींत वाढ; ‘त्या’ चॅटवरुन क्रांती रेडकरची पोलिसात धाव

लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर, प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

इंधन दर स्वस्त करण्यासाठी ‘हा’ आहे मोदी सरकारचा ‘मास्टर प्लान’

राज्य सरकारने दिलेली ‘ही’ ऑफर एसटी कर्मचारी मान्य करणार का?

…म्हणून ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमनं मागितली नारायण राणेंची माफी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More