बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे घरीच मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं; महाराष्ट्रातील ‘या’ तीन शहरांमध्ये सर्वाधिक घटना

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनामुळे अत्यंत विदारक चित्र पहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव आटोक्यात येत नसल्यानं अखेर राज्य सरकारला संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर करावा लागला आहे, मात्र अद्यापही महाराष्ट्रातील चित्र दिलासा देणारं नाही. रुग्णालयांमध्ये रांगा लागल्या असून कुणाला बेड मिळत नाहीत, तर कुणाला ऑक्सिजन मिळत नाही. राज्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत आणखी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे, जी सर्वांना काळजी करायला लावणारी आहे.

कोरोनामुळे लोक दहशतीच्या सावटाखाली आहेत. अशा परिस्थिती सर्दी, खोकला किंवा ताप आला तर तो अंगावरच काढणाऱ्या लोकांचं प्रमाण अधिक आहे. कोरोनाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि जेव्हा कोरोना झाला हे कळतं तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. काही काळातच अशा लोकांना मृत्यू गाठतो.

Photo courtesy- Pixabay

घरी कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या राज्यात आता वाढत चालली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातील तीन शहरं यामध्ये आघाडीवर आहेत. यामध्ये पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये घरीच कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहेत. त्यामुळे या शहरातील नागरिकांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

सध्या महाराष्ट्रात एकूण ६ लाख २० हजार ६० कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत, मात्र याशिवाय ज्यांनी कोरोनाची चाचणीच केलेली नाही पण त्यांना कोरोना झालेला आहे, असे अनेक रुग्ण असू शकतात. कोरोनासदृश्य लक्षणं असली तरी त्याकडे दुर्लक्ष करुन अंगावर काढणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे त्यामुळे ही आकडेवारी देखील समोर येत नाही. थेट तब्येत खालावल्यानंतरच ते रुग्णालयात दाखल होतात.

Photo Courtesy- Pixabay

महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्समधील प्रसिद्ध डॉ. तात्याराव लहाने यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. हे काही पडसं किंवा खोकला नाही, हा कोविड आहे. एकदा का तो वाढला की त्यावर उपाय नाही. तुम्हाला ताप किंवा कणकण असेल तरी कोविड टेस्ट करायला हवी. सध्या राज्यात मृत रुग्ण रुग्णालयात आणण्याची संख्या वाढत आहे किंवा रुग्णालयात आल्यानंतर २४ तासात काही जणांचा मृत्यू होत आहे, असंही ते म्हणाले.

राज्यात कोरोनाची चाचणी करण्यासाठी लागणारे आरटीपीसीआर किट मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र त्रास जाणवू लागल्यानंतरही रुग्ण तपासणीसाठी का जात नाहीत? हा मोठा प्रश्न आहे. त्यातच खासगी लॅब क्षमतेपेक्षा जास्त चाचण्या करतात त्यामुळे रिपोर्ट यायला वेळ लागत आहेत. अशा काळात कोरोना बाधित लोक इतरांना देखील बाधित करत आहेत, असंही तात्याराव लहाने म्हणाले.

Photo Courtesy – Pixabay

तात्याराव लहाने पुढे म्हणतात, की “सरकारी रुग्णालयांमध्ये आम्ही २४ तासाच्या आत कोविड टेस्टचा रिपोर्ट देतो. आता तसेच आदेश आम्ही खासगी लॅबवाल्यांना पण देत आहोत की त्यांनी कोरोना चाचणीचे नमुने घेतल्यानंतर २४ तासाच्या आत रिपोर्ट द्यावा. ज्यामुळे पॉझिटिव्ह असेल तर लवकर उपचार मिळतील आणि अधिक जण बाधित होणार नाहीत.”

दरम्यान, कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर देखील तो अंगावर काढणं अनेकांच्या जीवावर बेततं आहे. न्यूज १८ लोकमतनं यासंदर्भात एक बातमी दिली आहे. ज्यामध्ये बदलापुरात राहणारा ३२ वर्षीय युवक कोरोनाची लक्षणं दिसत असतानाही साध्या पॅरासिटामॉल गोळ्या घेत घरीच थांबला. त्याने कोणतीही कोरोना चाचणी केली नाही, मात्र जेव्हा लक्षणं वाढली तेव्हा त्यानं  आरटीपीसीआर चाचणी केली. त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. मधल्या काळात महत्त्वाचे ५ दिवस निघून गेले होते, आता ६ रेमडेसीवीर इंजेक्शन देण्यात आली तरी तो व्हेंटिलेटरवर गेला आहे. त्यामुळे कोरोनाचं लवकरात लवकर निदान होणं गरजेचं आहे. लक्षणं दिसली तर प्रत्येकानं चाचणी करायला हवी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार औषधं घ्यायला हवीत.

Photo Courtesy – Pixabay

थोडक्यात बातम्या-

कोरोनाची लस घेतल्यानंतर सेक्स करावा का?; अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर

पुण्यात कोरोनाचा आकडा वाढताच, वाचा आजची आकडेवारी

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण

“…तर कोरोनाची दुसरी लाटही आली नसती आणि लोकांचे जीवही गेले नसते”

बस कंडक्टर महिलेची निर्घृण हत्या; बुलडाण्यातील थरकाप उडवणारी घटना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More