Pune-Nashik Highway Accident | पुणे-नाशिक महामार्गावर (Pune-Nashik Highway Accident) नारायणगावजवळ (Narayangaon) आयशर टेम्पो (Eicher Tempo), प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी (Maximo Vehicle) आणि एसटी बसमध्ये (ST Bus) भीषण तिहेरी अपघात (Tragic Accident) झाला. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला असून अनेक जण गंभीर जखमी (Seriously Injured) आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रत्यक्षदर्शींनी (Eyewitnesses) दिलेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो ओव्हरटेक (Overtake) करण्याच्या प्रयत्नात असताना त्याची धडक प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो गाडीला लागली. या धडकेमुळे मॅक्झिमो गाडी समोरील कोल्हापूर डेपोच्या (Kolhapur Depot) एसटी बसवर जाऊन आदळली. आयशर टेम्पो आणि बसमध्ये मॅक्झिमो गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात मॅक्झिमोमधील ११ प्रवासी गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचे भीषण दृश्य
अपघातानंतर घटनास्थळी भीषण दृश्य पाहायला मिळाले. आयशर टेम्पो आणि बसमध्ये मॅक्झिमो गाडी पूर्णपणे चेपली गेली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मृतांची संख्या वाढण्याची भीती
या अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (Pune-Nashik Highway Accident)
Title : Pune-Nashik Highway Accident Nine Dead
महत्वाच्या बातम्या-
‘सोलो ट्रिप’ला जाण्याचे आहेत खूप फायदे, आयुष्यात एकदा तरी जाच
सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात?, ‘हा’ सोपा घरगुती उपाय करा
अभिनेता सैफ अली खानच्या एकूण संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!
धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ, आता ‘ते’ प्रकरण देखील भोवणार?
हवामानात मोठा बदल होणार?; पंजाबराव डख यांच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना