12 उपक्रमशील शिक्षकांना विनोबा पुरस्कार प्रदान!

Pune News | बदलत्या काळानुसार अध्यापन पद्धतीमध्ये देखील बदल झाले आहेत. संपूर्ण जग आता इंटरनेटमुळे अधिक वेगवान आणि जलद झाले आहे. यामुळे कोणतीही अडचण आली तरी शिक्षणामध्ये कोणताही अडथळा येत नाही. मुलांना घर बसल्या ऑनलाइन शिकवले जाते. याच बदलत्या काळानुसार शिक्षकांना देखील सगळे बदल कळावेत, म्हणून काही वर्षांपुर्वी पुण्यात जिल्हा परिषद शाळेत ‘विनोबा’ हे अ‌ॅप विकसित करण्यात आले. (Pune News )

या अ‌ॅपचा वापर हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि शिक्षकांच्या अध्ययन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी होत आहे. विनोबा अ‌ॅपच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात जिल्ह्यातील विविध शैक्षणिक प्रकल्पांतील उपक्रमशील शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो.

पुण्यातील 12 शिक्षकांचा गौरव

बारामती गटशिक्षणाधिकारी संपत गावडे, विस्तार अधिकारी कुचेकर, आगवणे मॅडम, तामणे , केंद्रप्रमुख जगताप, बीआरसी सागर गायकवाड तसेच विनोबा ऍपचे समन्वयक अशोक वाघमारे, भैरव गायकवाड यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या शाळांतील 12 शिक्षकांना मार्च ते जून 2024 चे जिल्हास्तरीय ‘विनोबा अॅप’ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. (Pune News )

विनोबा अ‌ॅपच्या माध्यमातून शिक्षकांचे उपक्रम शेअर करणे, शिक्षकांना प्रेरणा देणे, प्रशासकीय माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी या अ‌ॅपचा उपयोग केला जातो. यंदा पुण्यातील 12 शिक्षकांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांना जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

‘या’ शिक्षकांना मिळाला पुरस्कार

यामध्ये शरद मानसिंह रसाळ, संतोष महादेव सातपुते, वणीता सचिन जाधव, दीपाली मिलन साळुंखे, विद्या तानाजी गावडे, प्रीतम संतोष सातपुते, ज्ञानेश्वर भापकर, अलका शरद रसाळ, सुजाता सुधाकर जाधव, मीनाक्षी होले, कुसुम सोमनाथ जाधव, कविता ज्ञानेश्वर बापकर या शिक्षकांचा जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. (Pune News )

News Title – Pune News 12 teachers honored with Vinoba Award

महत्त्वाच्या बातम्या-

केरळमधील भूस्खलनग्रस्तांसाठी साऊथ अभिनेत्याचा पुढाकार; दिले लाखोंचे योगदान

नागरिकांनो ‘या’ मेसेजपासून सावध राहा; अन्यथा बँक खात होऊ शकत रिकामं

“शरद पवारांनी महाराष्ट्राचं मणिपूर करायला हातभार..”; राज ठाकरेंचा हल्लाबोल

अलर्ट! येत्या काही तासात ‘या’ जिल्ह्यांत वाढणार पावसाचा जोर

12 पैकी ‘या’ 2 राशींवर महादेवाची कृपा राहणार