Pune News | गेल्या आठवड्यात पुण्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं होतं. पुण्यात पहिल्यांदाच इतका पाऊस झाला. त्यातच पुण्यातील खडकवासला धरण ओव्हरफ्लो झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला. धरणातून सोडलेल्या या पाण्यामुळे पुण्यातील बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शहरातील अनेक भाग हे पाण्याखाली गेले होते. (Pune News )
पावसाचे पाणी अनेक घरांत, दुकानात शिरले होते. यामुळे बऱ्याच नागरिकांचे नुकसान झाले आहे. सध्या पुणेकर हे या भीषण स्थितीमधून सावरत आहेत. अशात पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पूरग्रस्तांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार
ज्या नागरिकांचे पुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याबद्दलचे आश्वासन दिले आहे. पुरात ज्यांचे कोणाचे नुकसान झाले आहे, त्यातील प्रत्येक कुटुंबाला 25 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सुहास दिवसे यांनी म्हटले आहे.(Pune News )
पूरस्थितीत पुराचे पाणी दोन दिवस घरात साचून राहिले असेल तरच मदत मिळेल, असे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले होते.मात्र, आता ही अट शिथिल करण्यात आली आहे. तसेच पूरग्रस्त मदतीची रक्कम प्रतिकुटुंब पाच हजारांवरून दहा हजार रुपये करण्यात आली आहे.
दुकानदार आणि टपरीधारक यांनाही मिळणार मदत
याचबरोबर नुकसानग्रस्तांमध्ये दुकानदार आणि टपरीधारक यांचाही समावेश करण्यात आलाय. याबाबतचे आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या महसूल विभागाने याबद्दलची घोषणा केली आहे.तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक कुटुंबाला 25 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.(Pune News )
तसेच स्थानिक रहिवासी, शिधापत्रिकाधारक, मतदारयादीत नाव असलेले आणि नोंदणीकृत परवानाधारक दुकानदार आणि टपरीधारक यांना नुकसानच्या 75 टक्के किंवा कमाल 50 हजार रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती आहे.
News Title – Pune News 25 thousand rupees help to flood victims
महत्त्वाच्या बातम्या-
ठरलं तर! ‘या’ दिवशी सत्ताधारी व विरोधक प्रचाराचा नारळ फोडणार
पुण्यात आणखी एक हिट अँड रन; पोलीस चौकीसमोरच कारनं दुचाकीला नेलं फरफटत
ठाकरेंच्या उमेदवाराची करामत!, विनेश फोगाटला निकालाआधीच दिलं सिल्व्हर मेडल
पुणे ते बीड 250 किलोमीटर, बजरंग सोनवणेंनी संसदेत बोलताना सांगितलं 500 किलोमीटर!
पोस्टाच्या ‘या’ योजनेत मिळतंय बक्कळ व्याज; महिन्याला कमवा 10 हजार रुपये