ते अचानक गेले अन्…; महिन्याभरात घडलं असं काही की पोलिसही चक्रावले

Pune news | सुसंस्कृत अशा पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून धक्कादायक घटना घडत आहेत. अपघात सत्र, ड्रग्स प्रकरण, भर दिवसा गोळीवार, रस्त्यावर कोयते काढून हत्या करणे अशा घटनांमुळे पुण्यात सुरक्षेबाबत आणि पोलिस प्रशासनावर अनेक प्रश्न केले गेले. आता पुणं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मात्र, यावेळी त्याचं कारण फारच विचित्र आहे.पुण्यात गेल्या काही दिवसांत अचानकच काही लोक गायब झाले आहेत. पुण्यातील शिरूरमधून लोक(Pune news) गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत.

यामध्ये अल्पवयीन मुली, तरुण आणि तरुणी यांचं गायब होण्याचं प्रमाण अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यात मिसिंगच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अचानक हे लोक गायब होत असल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.

पुण्यात महिन्याभरात 5 व्यक्ती गायब

महिनाभरात असे 5 जण अचानक गायब झाले आहेत. यामुळे कुटुंबीय देखील हैराण झाले आहेत. पोलिस आता त्यांचा शोध घेत आहेत. या सर्व प्रकाराची पुण्यात एकच चर्चा रंगली आहे. जुने शिरुर (रामलिंगम) या भागातून काही दिवसांपुर्वी एक 44 वर्षीय महिला गायब झाली आहे. सुमन सखाराम साळवे असं या महिलेचं नाव (Pune news)असून ती तिचा मुलगा जीवन सखाराम साळवे वय 18 याच्यासोबत गायब झाली आहे.

सुमन आणि त्यांचा मुलगा दोघेही सकाळी 7 वाजता घराबाहेर पडले. मात्र, रात्र झाली तरी ते घरी आलेच नाही.सुमन हिने पती सखाराम साळवे यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला होता. शााळेतील शिक्षक व कर्मचारी त्रास देत असल्याने आम्ही निघून जात आहोत, असं या मेसेजमध्ये म्हटल्याची माहिती आहे. या प्रकरणी आता तपास केला जात आहे.

पोलिसांकडून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू

तर, शहरातील सोनार आळीतून प्रतिक्षा वैभव शहा ही 20 वर्षाची तरुणी देखील गायब झाली आहे. ही मुलगी 23 जुलैपासून बेपत्ता आहे. तिचा अजूनही शोध लागलेला नाही. यानंतर शिरूरच्या बागवान नगरमधील एक अल्पवयीन मुलगीही बेपत्ता झाली आहे. त्याचबरोबर शिक्रापूर येथून मनिषा राजेंद्र शुक्ला ही 35 वर्षाची(Pune news)महिला देखील गायब झाली आहे. ही महिला भाजी मार्केटमध्ये गेली होती. पण, ती परत आलीच नाही.

पुण्यात एक तरुण देखील असाच अचानक गायब झाला.  बुद्धभूषण पठारे असं या तरुणाचं नाव आहे. तो 24 वर्षाचा असून एमपीएससीचा विद्यार्थी आहे. त्याने घरी मंत्रालयात नोकरी लागल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर तो गायब झाला. आज तीन महिने झाले तरी त्याचा पत्ता लागलेला नाही. पोलिस आता या प्रकरणी तपास करत आहेत. मात्र, या प्रकरणांची पुण्यात एकच चर्चा रंगली आहे.

News Title :  Pune news 5 people gone missing in 1 month

महत्त्वाच्या बातम्या-

“तुझी माफी मागण्याची लायकी नाही, तुला..”; भाजपमध्ये गेलेल्या अभिनेत्याची पोस्ट

भारताला सर्वात मोठा धक्का; विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र

खुशखबर! सोनं झालं स्वस्त, चांदीचाही मोठा दिलासा

पुढील काही दिवस राज्यात अशाप्रकारे असणार हवामान?

‘मोदी तेरी कब्र खुदेगी’च्या घोषणा देऊन..; कंगनाकडून विनेश फोगटला उपरोधिक शुभेच्छा