पुण्यात झिका व्हायरसचा धोका वाढला; आणखी 9 रुग्ण आढळल्याने खळबळ

Pune News | राज्यातील पुणे शहरात झिकाचे रुग्ण वाढतच चालल्याचे चित्र आहे. रविवारी आणखी 9 जणांना याची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता बाधित रुग्णांची संख्या ही 48 वर पोहोचली आहे. यामुळे (Pune News) चिंता व्यक्त केली जात आहे.

या 9 रुग्णांपैकी 7 रुग्ण पुणे महापालिका हद्दीत वाघोलीमधील असून पुणे ग्रामीण आणि पुणे कँटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. या नव्या रुग्णांमध्ये शिवणे येथील 25 वर्षीय गर्भवती महिलेचा समावेश आहे. या महिलेला ताप, पुरळ, अंगदुखी आणि डोकेदुखी अशी लक्षणे आढळून आली.

पुण्यात रुग्णांचा आकडा 48 वर

यामुळे तातडीने महिलेचे नमुने 22 जुलै रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले होते. ही महिला 20 आठवड्यांची गर्भवती आहे. शनिवारी तिच्या रक्ताचे नमुने हे पॉझीटीव्ह आले. तसेच कोथरूड येथील आणखी एका 80 वर्षीय महिलेला झिका विषाणूची लागण झाली असून सध्या तिच्यावर उपचार (Pune News)सुरू आहेत.

कात्रज येथील आणखी एका दहा वर्षीय मुलाला देखील शुक्रवारी झिका विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली. या मुलाला ताप, अंगदुखी आणि डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. या मुलावर सध्या उपचार करण्यात येत आहेत.

पुण्यात 20 जूनपासून झिका विषाणूचे 48 रुग्ण आढळले असून त्यात 14 गरोदर महिलांचा समावेश आहे. या 48 रुग्णांमध्ये मनपामधील 44, पुणे ग्रामीणमधील 3 (भूगाव, सासवड आणि वाघोली येथील प्रत्येकी एक) आणि पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीतील एका रुग्णाचा समावेश आहे.

झिका व्हायरसची लक्षणे काय आहेत?

– सौम्य ताप येणे.
– शरीरावर पुरळ उठणे
– डोळ्यात लालसरपणा येणे.
– स्नायू आणि सांधेदुखी
– डोकेदुखी (Pune News)

News Title –  Pune News 9 new cases of zika virus

महत्त्वाच्या बातम्या-

“..ते सगळं ऐश्वर्याला कधीच मान्य नव्हतं”; सलमान-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल मोठा खुलासा समोर

SBI बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ‘इथे’ करा झटपट अर्ज

वरळीत पुन्हा हिट अँड रन; अत्तर व्यवसायिकाच्या गाडीने तरुणाला उडवले

राज्यात पावसाचा जोर ओसरला तरी धोका कायम; पुढचे 4 दिवस..

महादेवाच्या कृपेने ‘या’ राशीच्या व्यक्तींची सर्व कामे मार्गी लागतील!