पुण्यात हादरून टाकणारी घटना, पत्नीला लॉजवर नेत पतीनेच केलं असं काही की..

Pune News | पती-पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना पुणे शहरातील (Pune News) भारती विद्यापीठ येथे घडली आहे. पती पत्नी हे संसाराच्या गाड्याची चाकं असतात. मात्र आता पतीने उचललेलं पाऊल हे पती-पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारं ठरलं आहे. पतीने आपल्या पत्नीला भारती विद्यापीठ येथील एक लॉजवर नेत चाकूने वार करत तिची हत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Pune News)

पतीने पत्नीचा केला खून, पतीवर गुन्हा दाखल

या घडलेल्या प्रकरणात पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे. एका 27 वर्षीय पत्नीचा नराधम पतीने जीव घेतला आहे. या नराधम पतीला भारती विद्यापीठातील पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये घटस्फोटाचं प्रकरण सुरू होतं. मात्र, दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचं ठरवलं. यानंतर पतीने पत्नीला लॉजवर भेटून चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं. शनिवारी दुपारी दोघंही भारती विद्यापीठ परिसरातील अश्विनी लॉजवर गेले. तिथे त्यांनी मद्यपान केलं. नशेत त्यांचा पुन्हा वाद झाला आणि या वादातून पतीने चाकूने भोसकून पत्नीची हत्या केली. यानंतर पती बाहेरून लॉक लावून फरार झाला.

पती आपल्या मित्रांसोबत मद्यपान करत असताना त्याने ही गोष्ट मित्रांना सांगितली. याबद्दल ऐकताच मित्र घाबरले आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी लॉजवरील मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली.

पुणे शहरात गुन्हेगारी सत्र सुरू

दरम्यान, पुणे (Pune News) हे विद्येचं माहेरघर आहे. मात्र पुणे शहरात अद्यापही गुन्हेगारी सत्र सुरू असलेलं पाहायला मिळतेय. तर पुणे शहरात वाहतुकीच्या बाबतीत अनियमितता पाहायला मिळते. तर याआधी पुणे शहरामध्ये (Pune News) एका शालेय विद्यार्थीनीने एका युवकाला प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. त्यामुळे युवकाने मुलीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे दहशत निर्माण झाली होती.

News Title – Pune News About Husband Killed Wife In Hotel

महत्त्वाच्या बातम्या

“नाद फक्त तुमचाच”, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा ‘तो’ व्हिडिओ तूफान व्हायरल

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट, मतमोजणीबाबत ठाकरे गटाचा गंभीर आरोप

‘सामे’ गाण्यावर सोनालीने लगावले ठुमके; दिलखेचक अदांपुढे सारेच घायाळ, पाहा Video

“देवेंद्र फडणवीसांनी सोलापूरात दंगली घडवण्याचा प्रयत्न केला”; कॉँग्रेसच्या आरोपांनी राज्यभर खळबळ

“झुंडमे कुत्ते आते है.. शेर अकेला आता आहे”; शिंदे गटाच्या बॅनरबाजीनंतर राणेंच्या बॅनरने वेधलं लक्ष