बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील कात्रजच्या घाटात भडकलेला वणवा सयाजी शिंदेंनी विझवला

पुणे | पुण्यातील कात्रज बोगद्याजवळच्या घाटात अचानक वणवा लागला होता. घाटातील पेटलेला वणवा पाहताच गाडी थांबवून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हा वणवा विझवला. त्यामुळे अनेक झाडे वाचली असून कात्रज टेकडीही वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचली आहे.

सयाजी शिंदे आणि नगरसेवक राजेश बराटे हे पुणे मार्गे सातारच्या दिशेने निघाले होते. मात्र कात्रजच्या नवीन बोगद्याच्या जवळून जात असताना त्यांना वर धुराचे लोट दिसले. त्यानंतर त्यांनी गाडी थांबवून पाहिले असता आग भडकलेली दिसली. त्याच बरोरबर त्यांनी तात्काळ आगीच्या ठिकाणी धाव घेऊन सहकाऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यास सुरुवात केली.

एका झाडाची फांदी तोडून आगीवर आपटण्यास सुरुवात केली. तर त्यांच्या सहकाऱ्यांनी आगीवर माती टाकून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझवत असतानाच जोराचा वारा सुटल्याने आग आणखीनच पसरत होती. त्यामुळे एककीडे आग विझवित असताना दुसरीकडे आग भडकत चालल्याने शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. मात्र तरीही शिंदे यांनी हार मानली नाही.

शिंदेंनी आग विझविण्याचं काम सुरूच ठेवलं अखेर तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणली. त्यानंतर आगीवर माती टाकून आग पूर्णपणे विझल्याची खात्री झाल्यावरच ते तिथून निघाले.

https://www.youtube.com/watch?v=hOlOxVApIgI&feature=youtu.be

ट्रेंडिंग बातम्या-

ज्येष्ठ नागरिकांच्या अनुदानात दुप्पट वाढ; ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांची घोषणा

“दिल्ली दंगल हा मुस्लीम किंवा काॅंग्रेसचा नव्हे तर डाव्यांचा डाव”

महत्वाच्या बातम्या-

राज ठाकरे-मिलिंद एकबोटे यांच्या भेटीवर भुजबळ म्हणाले…

“सांगितलेलं ऐकलं असतं तर आबा आज आपल्यात असते”

भारतीय महिला संघाच्या पराभवावर शरद पवार म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More