Pune News | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी दंड थोपटले आहेत. ते राज्यभरात अनेक ठिकाणी भेटीगाठी घेताना दिसत आहेत. अशातच आता अजितदादांचा आमदार शरद पवारांच्या गोटात जाणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण काल परवा शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. यावेळी अजितदादांचे आमदार बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटात आले. यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. (Pune News)
अजितदादांचा आमदार शरद पवारांच्या सभेत
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार हे राज्यभरात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यात (Pune News) सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने गोल्डन जुब्ली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजितदादांचे आमदार चेतन तुपे हे शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर बसले होते. त्यामुळे चेतन तुपे हे लवकरच शरद पवार गटात येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
चेतन तुपे हे शरद पवारांसोबत व्यासपीठावर कसे बसले असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचं कारण समोर आलं आहे. चेतन तुपे यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित असल्याची माहिती आता समोर आली आहे. हा कार्यक्रम हडपसर येथे होता. त्यामुळे चेतन तुपेंना निमंत्रण देण्यात आलं होतं. चेतन तुपे हे शरद पवारांच्या भेटीसाठी आले होते. मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. (Pune News)
शनिवारी शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर येथे दौरा करत होते. त्यावेळी अजित पवारांचा आमदार दुर्राणी हे शरद पवारांसोबत आले. त्यांनी अजित पवारांची साथ सोडली. अजितदादा गटातील असे अनेक आमदार हे शरद पवारांच्या गटामध्ये पक्षप्रवेश करतील अशी शक्यता नाकारता येत नाही. (Pune News)
अनेक आमदार आमच्या संपर्कात- शरद पवार
याआधी शरद पवार गटातील नेत्यांनी माध्यमांशी बोलत असताना अजितदादांचे अनेक आमदार आमच्यासोबत येणार असल्याचं म्हटलं होतं. यामुळे विधानभेच्या तोंडावर अजितदादांचे अनेक आमदार शरद पवारांसोबत येतील, मात्र कोणाला घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही याचा अधिकार शरद पवार आणि पक्ष घेईल.
News Title – Pune News Ajit Pawar MLA Chetan Tupe Sharad Pawar Meeting Attend Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
“नासक्या आंब्याला खड्यासारखा बाजूला करणार”; शरद पवारांचा इशारा
घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान, ऐश्वर्याला अभिषेककडून मोठ सरप्राईज!
गुड न्यूज! आयफोन झाले स्वस्त, नव्या किमती ऐकून विश्वास बसणार नाही
राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट
तब्बल 16 वर्षांनंतर ‘या’ प्रसिद्ध कलाकाराने सोडली TMKOC मालिका!