नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं, शेतकऱ्याने ‘इतक्या’ लाखांना खरेदी केला बैल

Pune News Bailgada Sharyat | हौशेचं मोल हे प्रत्येकालाच मोजता येईलच असं नाही. हौस ही प्रत्येकालाच असते. गरीब-श्रीमंत अशा सर्वांना हौसमौज असते. मात्र शेतकऱ्याची हौसमौज ही इतर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपेक्षा निराळी असते. अशातच आता ग्रामीण पुणे येथील एका शेतकऱ्याने 21 लाखांचा बैल विकत घेतला आहे. याची सध्या जोरदार चर्चा आहे. (Pune News Bailgada Sharyat)

शेतकऱ्याने तब्बल 21 लाखांना बैलाची खरेदी केली

अनेकांना वाटलं होतं की शेतकऱ्याने केटली विकत घेतली. पण केटली हे दुसरं तिसरं काहीही नसून बैल आहे. बैलगाडा शर्यतीतला बैल. त्या बैलाला पाहण्यासाठी तोबा गर्दी होताना दिसते. पुणे येथील पाचारणेवाडी येथील शेतकरी राजेंद्र पाचारणे यांनी तब्बल 21 लाखांना बैलाची खरेदी केली आहे. (Pune News Bailgada Sharyat)

निमशहरीकरणात एखादा फ्लॅट विकत घ्यायचा म्हटलं तरीही 20 ते 25 लाख रूपये मोजावे लागतात. मात्र शेतकरी पाचारणे यांनी तब्बल 21 लाखांना बैल विकत घेतला आहे. याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. बैलाची वाजत गाजत मिरवणूक काढली होती. त्यांनीच बैलाचं स्वागत केलं. (Pune News Bailgada Sharyat)

शेतकऱ्याचा नाद करायचा नाही; 21 लाखांना खरेदी केला 'किटली'

सध्या बैलगाडा शर्यत सुरू आहे. जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं आहे. ग्रामीण भागात बैल खरेदी-विक्रीचे बाजार भरत असतात. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ग्रामीण भागात पाचारने वाडी येथे बैलाची मोठ्या प्रमाणात बाजर उभारू लागले आहेत. याचवेळी एका शेतकऱ्याने तब्बल 21 लाखांना बैल खरेदी केला असल्याची माहिती समोर आली आहे. (Pune News Bailgada Sharyat)

बैलांना इयर टॅग असणं बंधनकारक

अशातच आता बैलगाडा शर्यतीसाठी देखील काही नियम आहेत. त्यासाठी बैलाच्या कानाला इअर टॅग असणं गरजेचं आहे. इअर टॅग ही बारकोडची पद्धत आहे. ती सॉफ्टेअरमध्ये डेव्हलप केली जाते. त्यांची नोंद भारत सरकारकडे असते. बाजार समिती आठवडी बाजार खरेदी विक्री, इतर पशुधनाची विक्री करताना हा इअर टॅग दिला आहे की नाही याकडे लक्ष द्यावं लागणार आहे.

जर बैलाच्या कानाला जर इअर टॅग नसेल तर त्याला बैलगाडा शर्यतीत भाग घेता येणार नाही. तसेच बैल विकताना देखील बैलाच्या कानाला इअर टॅग लावणं गरजेचं आहे. इअर टॅग न लावल्यास बैलाची विक्री करता येणार नाही.

News Title – Pune News Bailgada Sharyat Kettli Ox Bull Sold Out Of 21 Lakh

महत्त्वाच्या बातम्या

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी, ‘या’ सेवेत बँकेकडून मोठा बदल

सातबाऱ्यामध्ये होणार बदल, महसूल विभागानं घेतला सर्वात मोठा निर्णय

कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी माहिती, डॉक्टरनेच दिला ‘तो’ धक्कादायक सल्ला

लेकाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने डॉक्टरला… कल्याणीनगर अपघात प्रकरणी नवी माहिती उघड

प्रियांका-निकच्या वयाबद्दल प्रियांकाच्या आईने केलं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…