बैल खरेदीच्या वादातून झाला गोळीबार, पुढे घडलं भयंकर?

Pune News | ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीचा अनेकदा मेळावा भरतो. त्यामुळे ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींना ग्लॅमर्स स्वरूप प्राप्त झालं आहे. मात्र यामुळे काही वाईट घटना घडताना दिसत आहेत. बारामती तालुक्याच्या निंबुत गावात शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. (Pune News)

बैलाच्या व्यवहारातून गोळीबार :

हा व्यवहार रणजीत निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्यात झाला होता. या व्यवहारामुळे दोघांमध्ये खटके उडाल्याने फलटण येथील रहिवासी रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. हा गोळीबार गुरूवारी रात्री उशीरा झाला आहे. (Pune News)

दरम्यान आता रणजीत निंबाळकर यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर बारामती तालुका हादरून गेला आहे. यामध्ये आता पोलिसांनी लक्ष घातलं असून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी गौरव काकडे, सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि मुलगा गौतम काकडे यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं आहे.

नेमकं काय घडलं? :

शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून एक धक्कादायक घटना घडली आहे. बारामतीच्या निंबुत गावात बैल खरेदीवरून वाद विकोपाला गेला. त्यातून गौतम काकडे नावाच्या व्यक्तीने रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळीबार केला. यामुळे आता अंकिता रणजीत निंबाळकर यांनी गौतम काकडे, गौरव काकडे आणि तीन अनोळखी व्यक्तींविरोधात फिर्याद नोंदवली आहे. (Pune News)

निंबुत येथे एका वर्षांआधी रणजीत निंबाळकर यांनी 61 लाख रूपयांना बैल विकत घेतला होता. बैलाचं नाव हे सर्जा असं होतं. त्यानंतर गौतम काकडे यांनी सुंदर नावाचा बैल हा 37 लाखांना विकत घेतला. मात्र ज्या दिवशी सुंदर नावाचा बैल विकत घेतला. तेव्हा पाच लाख रूपये रणजीत यांना देण्यात आले. (Pune News)

तसेच त्यावेळी गौतम काकडे यांनी तो बैल तसाच घेऊन आपल्या निंबुत गावी आले. त्यानंतर रणजीत निंबाळकर हे उर्वरित पैसे मागण्यासाठी आले असता त्यांच्यात वाद झाला. त्यातून गोळीबार झाला. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.

News Title – Pune News Baramati In Numbut Village Gun Firing Over Racing Bull Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

चांदीचे मंदिर, सोन्याच्या मूर्ती! अनंत व राधिकाची लग्नपत्रिका एकदा पाहाच

पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; ‘या’ भागातील पब, बारवर फिरवला बुलडोझर

टीम इंडियाचा दणदणीत विजय! इंग्लंडच्या पराभवाची ही आहेत 3 कारणे

या राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी

मोठी बातमी! आमदारांनी अजितदादांचं टेंशन वाढवलं