Pune News | केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्याला भर चौकात मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी मध्यरात्री गुंडांच्या टोळक्याने गोळीबार करत तलवार आणि कोयत्याने सपासप वार करून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. (Pune News)
गौरव अविनाश थोरात (Gaurav Avinash Thorat) (वय २२, रा. शास्त्रीनगर, कोथरुड – Kothrud) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी काही गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे.
फिर्याद आणि गुन्हा
याबाबत सागर वसंत कसबे (Sagar Vasant Kasbe) (वय ४७, रा. पी एम सी कॉलनी, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दिनेश भालेराव (Dinesh Bhalerao) (वय २७), सोहेल सय्यद (Sohel Sayyad) (वय २४), राकेश सावंत (Rakesh Sawant) (वय २४), साहिल वाकडे (Sahil Wakde) (वय २५), बंड्या नागटिळक (Bandya Nagtilak) (वय १८), लखन शिरोळे (Lakhan Shirole) (वय २७) आणि अनिकेत उमाप (Aniket Umap) (वय २२) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
घटनाक्रम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव थोरात आणि आरोपींमध्ये पूर्वी भांडण झाले होते. गौरव थोरात हा शास्त्रीनगर येथील दत्त मंदिराजवळ मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. यावेळी सोहेल सय्यद आणि त्याचे साथीदार तेथे आले. सोहेलने गौरवच्या दिशेने गोळी झाडली, पण ती गौरवला लागली नाही. त्यानंतर टोळक्याने तलवार, सत्तूर आणि कोयत्याने गौरवच्या मान, डोके, पोट आणि पायावर वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि त्याचा खून केला.
पोलीस तपास
घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (Nikhil Pingale), संभाजी कदम (Sambhaji Kadam), सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे (Bhausaheb Pathare), अजय परमार (Ajay Parmar), राजेंद्र मुळीक (Rajendra Mulik), गणेश इंगळे (Ganesh Ingale), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने (Sandip Deshmane), पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम (Vikram Singh Kadam) यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी पिस्तूल, तलवार आणि सत्तूर जप्त केले आहे. गौरव थोरातच्या खून प्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी सांगितले. (Pune News)
Title : Pune News Brutal Murder of Youth by Gang in Kothrud