बकरी ईदनिमित्त आज पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Pune News Changes in transport  

Pune News | आज 17 जूनरोजी बकरी ईद असल्याने पुण्याच्या वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

तर, काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार मैदान चौक, मम्मादेवी चौक, ढोले पाटील चौक  परिसरातील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

पुण्यात वाहतुकीत मोठे बदल

तसेच गोळीबार मैदान चौकातून शंकरशेठ रस्तामार्गे स्वारगेटकडे जाणारा मार्ग सर्वप्रकारच्या वाहतुकीस बंद राहणार आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी गोळीबार मैदान चौकातून वळून सीडीओ चौक, उजवीकडे वळून गुलटेकडीमार्गे इच्छितस्थळी जावे.

काही रस्ते हे 10 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कोंढवा, लुल्लानगरमार्गे येणाऱ्या वाहनांनी खटाव बंगला चौक, नेपीयर रस्ता, मम्मादेवी चौक किंवा (Pune News ) वानवडी बाजार, भैरोबा नाला चौकमार्गे पुढील इच्छितस्थळी जावे.

पर्यायी मार्ग कोणते असणार?

यासोबतच शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकाकडून गोळीबार मैदान चौकाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलीये. सॅलसबरी पार्क, सीडीओ चौक, भैरोबानाला चौकमार्गे चालकांनी आपल्या इच्छितस्थळी जावे.

त्याचबरोबर सोलापूर रस्त्याने गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक देखील वळविण्यात आली आहे. तसेच, पुणे सोलापूर मार्गावरील भैरोबानाला चौकातून गोळीबार (Pune News ) मैदानाकडे येणारी वाहतूक देखील बदलली आहे. त्यामुळे वाहनचलकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

News Title-  Pune News Changes in transport

महत्त्वाच्या बातम्या –

राज्याच्या महसूल विभागाचा गजब कारभार, जिजाऊंच्या पुण्यतिथीला जयंतीचं अभिवादन

पश्चिम बंगालमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना; मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक

तरुणांनो बारमध्ये दारु पिण्यासाठी द्यावा लागणार हा पुरावा!

राज्यातील ‘या’ जिल्ह्याला यलो अलर्ट; तर इतर जिल्ह्यात कसे असणार वातावरण

ओबीसी समाज एकवटला; 57 लाख बोगस कुणबी नोंदी तातडीने रद्द करा,अन्यथा…

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .