पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर!

Pune News | गेल्या काही दिवसांत पुण्यात मुळसाधार पाऊस झाला. पहिल्यांदाच येथे पावसाने अनेक विक्रम मोडले. अनेक भागात दरडी कोसळल्या तर कुठे वसाहती पाण्याखाली गेल्या. पहिल्यांदाच पुण्यात पावसामुळे आर्मीला मदतीसाठी उतरावे लागले. पावसामुळे येथे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना समोर येत होत्या. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळावर बंदी (Pune News ) आणण्यात आली होती.

पर्यटनस्थळांवर जमावबंदीचे आदेश शिथिल

पुढील सूचना येईपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळे बंद राहतील अशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या. मात्र, आता पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पर्यटनस्थळांवर लागू करण्यात आलेले जमावबंदीचे आदेश आजपासून म्हणजेच गुरुवारपासून (१ ऑगस्ट) शिथिल करण्यात आले आहेत.

त्यामुळे पुणेकर आता सुट्टीचा आनंद पर्यटन स्थळी मौज-मज्जा करून घेऊ शकतात. मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर आणि वेल्हा या आठ तालुक्यांतील गड-किल्ले, पर्यटनस्थळे, धरणे, धबधबे अशा पर्यटनस्थळांवर लागू करण्यात आलेले जमावबंदीचे आदेश आता शिथिल करण्यात आले (Pune News ) आहेत.

पुण्यात पावसाची विश्रांती

पण, स्थानिक परिस्थिती बघून प्रतिबंधात्मक आदेश लागू करायचे किंवा नाही, याचा निर्णय प्रांताधिकारी यांनी घ्यावा असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत, यासाठी पर्यटन स्थळी जमावबंदीचे आदेश 2 जुलै रोजी दिले होते.

हे आदेश 31 जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आले होते. मात्र, आता हे आदेश शिथिल करण्यात आले आहेत. पुण्यात सध्या पावसाने देखील विश्रांती घेतली आहे.मात्र, पावसाची (Pune News ) संततधार सुरू आहे. आज पुण्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

News Title- Pune News curfew orders relaxed at tourist spots

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत मिळणार मोठी जबाबदारी?

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; LPG सिलेंडरच्या किंमतीत वाढ

ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस शुभ की अशुभ?, वाचा आजचे राशीभविष्य

दहावी पास तरुणांसाठी थेट सरकारी नोकरीची संधी; होमगार्ड पदांसाठी भरती सुरू

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना IMD चा महत्वाचा इशारा