Pune News | पुण्यात कल्याणीनगर परिसरात एका लक्झरी पोर्श कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास बॉलर पबजवळ ही घटना घडली होती. ही कार चालवणारा मुलगा अल्पवयीन असून त्याला आता जामीनही मिळाला आहे.
कारचालक अल्पवयीन मुलगा एका नामांकित रिअल इस्टेट डेव्हलपरचा मुलगा आहे. या 17 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, आरोपी तरुणाला 12 तासांच्या आत जामीन मंजूर झालाय. कोर्टाने काही अटींसह त्याला जामीन दिला आहे. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी आता सरकारने दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी याबाबत कठोर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विशाल अग्रवाल यांच्या आरोपी मुलाला पोलिसांकडून विशेष वागणूक दिल्याचाही आरोप ठेवण्यात आला.यावरही फडणवीस यांनी निर्णय घेतलाय.
देवेंद्र फडणवीस यांनी दिले कारवाईचे आदेश
या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तात्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, काही मीडिया रिपोर्टनुसार अल्पवयीन आरोपीच्या वडिलांविरोधात आणि बार मालकाविरोधात कलम 75 आणि 77 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे वडिलांविरोधात (विशाल अग्रवाल) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, बार मालकाने दारु सर्व्ह केल्यामुळे त्याच्या विरोधातही कारवाई केली जाणार आहे.
बिल्डराच्या आरोपी मुलाला पोलिस स्टेशनमध्ये पिझ्झा दिला?
या प्रकरणी आता राजकारणही चांगलंच तापलं आहे. कॉँग्रेसकडून यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील कॉँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काही मागण्या केल्या आहेत. अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या मुंढव्यातील Cosie रेस्टॉरंट, Marriott suits मधील Black पब,Ballr पब या सर्व पब मालकांवर देखील अटकेची कारवाई करत हे पब कायम स्वरुपी बंद केले पाहिजे. असं धंगेकर यांनी म्हटलंय.
कल्याणीनगर मधील घटनेत कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणजे परत कोणी पैश्यावाल्याची औलाद अशी मस्ती करणार नाही.
या घटनेतील दोषी –
१) पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल आग्रवाल ज्याने मुलाला ही आलीशान गाडी चालविण्यास दिली.या विशाल अग्रवालला तातडीने अटक झाली पाहिजे.२)अल्पवयीन मुलांना… pic.twitter.com/dPjjaFYSyC
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 20, 2024
पैश्याच्या जिवावर दोघांना किड्या मुंगी प्रमाणे चिरडणाऱ्या या मुलाला पोलीस स्टेशन मध्ये बिर्याणी आणि पिझ्झा आणून खाऊ घातला.या पोलिसांवर कारवाई करत येथील अधिकारी कर्मचारी निलंबित केले गेले पाहिजे. अशी मागणी देखील धंगेकर यांनी केली आहे.
News Title – Pune News Devendra Fadnavis Action order in Porsche Car Accident case
महत्त्वाच्या बातम्या-
रात्री झोपण्यापूर्वी दूध पित असाल तर आत्ताच बंद करा; होऊ शकतात गंभीर आजार
शेतकऱ्यांच्या पोटात आनंद मावेना, मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट समोर
अभिनेत्री छाया कदम यांची आईसाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट, “आई तु आज हवी होतीस…”
“…वयस्कर मतदार प्रतीक्षा करून घरी परतत आहेत”, ईव्हीएम मशीन बंद असल्याने आदेश बांदेकरांचा संताप
कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदारांचा उडाला गोंधळ