मॅट्रिमोनी वेबसाइटवरून ओळख, 10 लाख रुपये घेऊन लग्नाला नकार, डॉक्टर तरूणीने उचललं मोठं पाऊल

Pune News Doctor commits suicide after being cheated on matrimonial site

Pune News | आजकाल डेटिंग (Dating) किंवा मॅट्रिमोनी वेबसाइटवरून (Matrimonial Website) अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. पुण्यातून (Pune) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिले लग्न (Marriage) झालेले असतानाही ‘जीवनसाथी डॉट कॉम’ (Jeevansathi.com) या वेबसाइटवर अविवाहित (Unmarried) असल्याचे भासवत, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीकडून १० लाख रुपये उकळले आणि नंतर लग्नास नकार दिला. (Pune News)

हा मानसिक धक्का (Mental Trauma) सहन न झालेल्या डॉक्टर तरुणीने विषारी औषध (Poison) घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाणे (Bibwewadi Police Station) हद्दीत घडली असून पल्लवी पोपट फडतरे (Pallavi Popat Phadtare) (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे (Female Doctor) नाव आहे. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या आरोपी (Accused) कुलदीप आदिनाथ सावंत (Kuldeep Adinath Sawant) याच्याविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

‘जीवनसाथी डॉट कॉम’वरून ओळख आणि फसवणूक

पहिले लग्न झालेले असतानाही ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवर अविवाहित असल्याचे भासवून कुलदीप सावंत या तरुणाने २५ वर्षीय डॉक्टर महिलेशी संपर्क साधला. या वेबसाइटवर मैत्री (Friendship) केल्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवले. लग्नाचे वचन देत त्याने डॉक्टर महिलेकडून १० लाख रुपये उकळले. पैसे मिळाल्यानंतर त्याने आपले लग्न झाले असून पत्नी गर्भवती (Pregnant) असल्याचे सांगितले. (Pune News)

१० लाख रुपये घेऊन लग्नाला नकार दिल्याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने डॉक्टर तरुणीने क्लिनिकमध्येच (Clinic) विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून १० लाख रुपये उकळणाऱ्या कुलदीप सावंत या आरोपीविरोधात पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीजवळचा लॅपटॉप (Laptop) जप्त (Seized) केला आहे.

मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर ओळख वाढवताना सावधान (Caution)

सध्या मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरून ओळख वाढवून फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळल्याच्या घटना घडत आहेत. अनेकदा ऑनलाइन डेटिंगच्या (Online Dating) नावाखाली खोटी ओळख (Fake Identity), वेगळे नाव वापरून किंवा मैत्रीचा हात पुढे करून नंतर पैसे उकळले जात आहेत.

या घटना लक्षात घेता, मॅट्रिमोनिअल साइट्सवरून ओळख वाढवताना सावधपणेच (Cautiously) पावले उचलावी लागणार आहेत. अनोळखी व्यक्तींवर (Unknown Persons) चटकन विश्वास ठेवणे महागात पडू शकते. (Pune News)

Title : Pune News Doctor commits suicide after being cheated on matrimonial site

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .